खनिज निर्यात करात कपात होणारच!
By admin | Published: April 21, 2015 01:35 AM2015-04-21T01:35:42+5:302015-04-21T01:35:56+5:30
पणजी : राज्यातील खनिजासाठी असलेल्या निर्यात करात कपात होईलच. आपण बंगळुरूला दिलेल्या भेटीवेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली
पणजी : राज्यातील खनिजासाठी असलेल्या निर्यात करात कपात होईलच. आपण बंगळुरूला दिलेल्या भेटीवेळी केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्याशी चर्चा केली असून जेटली यांनी ते तत्त्वत: मान्यही केले आहे, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे ‘लोकमत’ला सांगितले.
मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील खनिज खाण व्यवसाय येत्या आॅक्टोबरपासून निश्चितच सुरू होईल. त्यासाठी खनिज निर्यात करात कपात व्हायला हवी किंवा तो रद्द व्हायला हवा, या खनिज व्यावसायिकांच्या मागणीची आपल्याला कल्पना आहे. बंगळुरू येथे झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणी बैठकीवेळी आपण जेटली यांच्याशी पुन्हा त्याबाबत चर्चा केली. जेटली यांनी आपल्याला सकारात्मक उत्तर दिले आहे. आज सायंकाळी मी दिल्लीस रवाना होत असून अन्य काही विषय घेऊन दिल्लीस जात आहे; पण खनिज निर्यात कराविषयी पुन्हा जेटलींशी बोलेन.
खनिज निर्यात करात कपातीची घोषणा केंद्रीय अर्थसंकल्पातून व्हायला हवी होती, अशी काहीजणांची अपेक्षा होती. आपणही त्याच्याशी सहमत आहे. मात्र, अर्थसंकल्पात घोषणा केली नाही म्हणजे खनिज निर्यात कर कमी होणार नाही, असे नव्हे.
केंद्र सरकारला गोव्याचा मुद्दा पटला आहे. आम्हाला आॅक्टोबरमध्ये खाण व्यवसाय नव्याने सुरू करायचा असल्याने केंद्र सरकार निर्यात करात कपात करील, असे मुख्यमंत्री
म्हणाले.
(खास प्रतिनिधी)