जेटींवरून खनिज वाहतूक सुरू, सल्लागार समितीने घेतला आढावा
By ऑनलाइन लोकमत | Published: April 5, 2018 09:58 PM2018-04-05T21:58:49+5:302018-04-05T21:58:49+5:30
सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जेटींवरून (रॉयल्टी भरलेल्या) खनिजाची वाहतूक काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. तत्पूर्वी तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार समितीने न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेतला व अशा प्रकारे खनिज वाहतूक करण्यासाठी जेटी खुल्या करण्याची सूचना शासकीय यंत्रणेला केली.
पणजी : सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार जेटींवरून (रॉयल्टी भरलेल्या) खनिजाची वाहतूक काल गुरुवारी सायंकाळी सहा वाजता सुरू झाली. तत्पूर्वी तीन मंत्र्यांच्या मंत्रिमंडळ सल्लागार समितीने न्यायालयाच्या आदेशाचा आढावा घेतला व अशा प्रकारे खनिज वाहतूक करण्यासाठी जेटी खुल्या करण्याची सूचना शासकीय यंत्रणेला केली.
वेदांता, फोमेन्तो ह्या कंपन्यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका सादर करून रॉयल्टी भरलेल्या मालाची बाजर्द्वारे वाहतूक करू दिली जावी, अशी विनंती केली होती. त्यानुसार न्यायालयाने दि. 15 मार्चला किंवा तत्पूर्वी ज्या मालाची रॉयल्टी भरली गेली व जो माल जेटींवर आहे, त्याची वाहतूक करण्यास परवानगी दिली. म्हणजेच हा खनिज माल जेटींवरून बंदरावर आणि तिथून जहाजासाठी निर्यातीसाठी नेता येतो. तशा प्रकारचीच चर्चा गोवा मंत्रिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीतही गुरुवारी झाली. लिज क्षेत्रबाहेर अन्य कुठेही ठेवलेल्या खनिज मालाची वाहतूक करता येत नाही. अशा मालासाठी अगोदर रॉयल्र्टी भरलेली असली तरी, त्याची वाहतूक करणो सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार शक्य नाही. मात्र वजन माप काटय़ाच्या पुढे जो खनिज माल गेलेला आहे, त्या खनिज मालाची वाहतूक करण्यास तीन मंत्र्यांच्या समितीने मंजुरी दिल्याची माहिती मिळाली. अशा प्रकारच्या मालाची वाहतूक करण्यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठाला त्याविषयी प्रतिज्ञापत्रद्वारे कळविले जाईल किंवा खंडपीठाकडून त्याविषयी स्पष्टीकरण घेतले जाईल, असेही एका मंत्र्याने लोकमतला सांगितले. सर्वोच्च न्यायालयाने फक्त जेटींवरील मालाचीच वाहतूक करता येते असे म्हटलेले आहे पण हायकोर्टाकडून अॅडव्हकेट जनरल सा:या शंकांचे निरसन करून घेतील, असे मंत्री फ्रान्सिस डिसोझा यांनी सांगितले.
हरवळेत पुन्हा पाणी शक्य
काही खनिज कंपन्या खाणींच्या खंदकातील पाणी उसपत नसल्याने हरवळे येथील धबधबा सुकल्याचा विषय सरकारने गंभीरपणो घेतला. साखळीचे आमदार डॉ. प्रमोद सावंत, जलसंसाधन मंत्री विनोद पालयेकर, मुख्य सचिव धमेंद्र शर्मा यांच्या उपस्थितीत साखळी मतदारसंघातील काही खाण कंपन्यांच्या प्रतिनिधींची बैठक झाली. त्या बैठकीवेळी खनिज व्यवसायिकांनी खंदकातील पाणी काढावे अशा सूचना दिल्या गेल्या. तसेच जलसंसाधन खाते आपले आणखी दोन पंप बसवून पाणी काढणार आहे. एक पंप खात्याने बसवला आहे. हे पाणी कुळागरे व शेतांसाठी सोडले जाईल. शिवाय हरवळेच्या धबधब्यातही पुन्हा पाणी येण्यास हे प्रयत्न मदतरुप ठरतील.