खाणी सुरू झाल्या, मग ट्रक कुठे आहेत? मायकल लोबोंनी सरकारला केला प्रश्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2024 12:36 PM2024-07-26T12:36:10+5:302024-07-26T12:36:35+5:30

शेती आणि खाण व्यावसाय हा एकेकाळी राज्याचा आर्थिक कणा होता.

mines started so where are the trucks michael lobo questioned the government | खाणी सुरू झाल्या, मग ट्रक कुठे आहेत? मायकल लोबोंनी सरकारला केला प्रश्न

खाणी सुरू झाल्या, मग ट्रक कुठे आहेत? मायकल लोबोंनी सरकारला केला प्रश्न

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : राज्यातील खाण व्यावसाय सुरुच झालेला नाही. मुख्यमंत्र्यांनी खाणींचा लिलाव होऊन खाण व्यावसाय सुरु झाल्याचे सांगितले. पण पूर्वी खाण व्यावसाय सुरु झाला की राज्यात ट्रक फिरताना दिसायचे तसे आता दिसत नाहीत. त्यामुळे सरकारने याबाबत सविस्तर माहिती द्यावी, अशी मागणी आमदार मायकल लोबो यांनी लक्षवेधी सूचनेवेळी केली.

शेती आणि खाण व्यावसाय हा एकेकाळी राज्याचा आर्थिक कणा होता. खाण व्यवसाय जेव्हा सुरु होते तेव्हा सर्वसामान्यांना रोजगार उपलब्ध व्हायचा. पण आता खाण व्यावसाय सुरु झाल्याचा दावा मुख्यमंत्री करत आहेत, पण पूर्णपणे हा व्यवसाय सुरु झालेला नाही. याचा आर्थिक फटका सामान्य लोकांनाच जास्त बसला आहे, असेही लोबो म्हणाले.

शिक्षण व्यावस्थेवर बोलताना लोबो यांनी सांगितले की, शिक्षण व्यावस्थेचा पाया अंगणवाडी आहे. पण अंगणवाडीच सर्वाधिक दुर्लक्षित आहे. राज्यातील अनेक अंगणवाडीत वीज नाही, पाणी नाही, तर काही ठिकाणी शौचालय देखील नाही. लहान मुलेच अंगणवाडीत जातात त्यामुळे या सुविधा अत्यावश्य असतात. त्यामुळे सर्वात आधी अंगणवाडी विकसीत करणे आवश्यक आहे. खासगी जागेत कार्यरत असलेल्या अंगणवाडी देखील सरकारने कायदेशीर पध्दतीने करारबद्द कराव्यात, असे लोबो यांनी सांगितले.

मोपाने नविन ठिकाणावरुन विमाने आपल्या रनवेवर आणली पाहीजे होती, परंतु त्यांनी असे न करता दाबोळीने तयार केलेलाच व्यावसाय हिसकावला आहे. दाबोळीवरील जवळपास सर्व आंतरराष्ट्रीय विमाने आपल्या रनवेवर ते उतरवित आहेत.

मोपाने इमॅरेट्स विमाने आपल्याकडे उतरण्यावर भर दिला पाहिजे, यातून त्यांनाही व्यावसाय मिळेल. राज्यात चांगल्या दर्जाचे पर्यटक येणार आणि दाबोळीला देखील महत्व येणार, असे माकलय लोबो यांनी यावेळी सांगितले.

मोपाने दाबोळीचा व्यवसाय हिसकावला

मोपा विमानतळ झाल्यापासून दाबोळी विमानतळाचे महत्व कमी झाले आहे. मोपाने खरंतर नव्याने व्यवसाय सुरु केला पाहीजे होता. नविन ठिकाणांवर विमाने पोहचावयला पाहिजे होती, असे मायकल लोबो विधानसभेत लक्षवेशी सूचनेवेळी म्हणाले.
 

Web Title: mines started so where are the trucks michael lobo questioned the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.