खाण घोटाळा - कारवारचे आमदार सतिशला दुसरा समन्स

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2018 10:09 PM2018-04-09T22:09:39+5:302018-04-09T22:09:39+5:30

गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर समन्स बजालेले कारवारचे आमदार सतिश सैल हे एसआयटीपुढे हजर झालेच नाहीत.

Mining scam: Karwar MLA Satish gets second summons | खाण घोटाळा - कारवारचे आमदार सतिशला दुसरा समन्स

खाण घोटाळा - कारवारचे आमदार सतिशला दुसरा समन्स

Next

पणजी: गोव्यातील खाण घोटाळा प्रकरणात सहभाग आढळून आल्यानंतर समन्स बजालेले कारवारचे आमदार सतिश सैल हे एसआयटीपुढे हजर झालेच नाहीत. त्यामुळे त्यांना एसआयटीकडून पुन्हा समन्स बजावण्यात आले असून आता शुक्रवारी मंगळवारी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 
 गोव्यातील खाण घोटाळ्याशी सैल याचा संबंध आढळून आल्यानंतर  या घोटाल्याचा तपास करणाºया एसआयटीने त्याला समन्स बजावले होते. परंतु वैयक्तीक कारणांमुळे आपण येऊ शकत नसल्याचे पत्र त्यांनी एसआयटीला पाठविले असून सोमवारी उपस्थित राहण्यापासून आपल्याला मोकळीक देण्याची मागणी त्यांनी केली आहे. तपासाला सहकार्य करण्याची तयारीही त्यांनी दाखविली आहे.  दरम्यान एसआयटीकडून त्यांना दुसरा समन्स पाठविण्यात आला आहे. शुक्रवारी चौकशीसाठी उपस्थित राहण्यास सांगितले आहे. 
मल्लिकार्जून शिप्पींग प्रायव्हेट लिमिडेट या निर्यातदार कंपनीचे सतीश संचालक आहेत. गोव्यातून बेकायदेशीररित्या वाहतूक करण्यात आलेला लोहखनीज हा ट्रेडर्सद्वारे या कंपनीला पुरविला जात होता. या कंपनीकडून त्याची नंतर निर्यात केली जात होती. खाण घोटाळ््यातील संशयित ट्रेडरच्या नोंदवहीत मल्लिकार्जून शिपिंगचा उल्लेख आढळला आहे. तसेच त्यांचे ट्रेडरर्शी आर्थिक व्यवहारही झाले आहेत. त्याचे बंधू व कुटुंबातील इतर सदस्यांचाही या व्वयाहांशी संबंध असल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Mining scam: Karwar MLA Satish gets second summons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.