स्मार्ट सिटीच्या कामांची मंत्री बाबूश यांनी केली पाहणी, ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले
By पूजा प्रभूगावकर | Published: March 1, 2024 01:13 PM2024-03-01T13:13:10+5:302024-03-01T13:14:48+5:30
शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांची मंत्री बाबूश यांनी शुक्रवारी पाहणी केली स्मार्ट सिटीची कामे ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्मार्ट सिटीचे एमडी संजीत रॉड्रिग्स व अन्य अधिकारी उपस्थित होते.
पणजी: शहरात सुरु असलेल्या स्मार्ट सिटी कामांची मंत्री बाबूश यांनी शुक्रवारी पाहणी केली स्मार्ट सिटीची कामे ३१ पर्यंत पूर्ण होतील असे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी स्मार्ट सिटीचे एमडी संजीत रॉड्रिग्स व अन्य अधिकारी उपस्थित होते.
स्मार्ट सिटी कामे ज्याठिकाणी सुरु आहे, तेथे बॅरीकेड घातले असले तरी काही वाहनचालक हे बॅरीकेड बाजूला करुन तेथून जातात. त्यामुळे आजूबाजूच्या इमारतींमधील फ्लॅटमध्ये धुळ जात असल्याने विशेष: करुन ज्येष्ठ नागरिकांना त्याचा त्रास होत आहे. याबाबत काही नागरिकांना तक्रार केल्याने आपण सांतिनेझ भागात पाहणी करण्यासाठी आलाे. या कामांच्या ठिकाणी व्यवस्थितपणे बॅरीकेड करावे अशी सूचना कंत्राटदारांना आपण केली आहे. स्मार्ट सिटीची सर्व कामे वेळेनुसार होत असून ती ३१ मे पर्यंत पूर्ण होतील असे बाबूश यांनी सांगितले.
इंध्रधनुष्य पहायचा असल्यास ज्याप्रमाणे पाऊस झेलावा लागतो, तसेच पणजी स्मार्ट बनवायची असल्यास थोडी कळ सोसावीच लागेल असा सल्लाही त्यांनी पणजीवासियांना यावेळी दिला.