किरकोळ वाद हाणामारीवर पोहोचून नंतर एका गटाने केला दुसऱ्यावर सुरीहल्ला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 29, 2019 11:16 PM2019-08-29T23:16:01+5:302019-08-29T23:16:12+5:30
दक्षिण गोव्यात असलेल्या वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेर खाण्याच्या गाड्यावर दोन गटात निर्माण झालेला किरकोळ वाद हाणामारीवर पोचल्यानंतर एका गटाने दुस-या गटातील दोघाजणांवर सु-याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
वास्को - दक्षिण गोव्यात असलेल्या वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेर खाण्याच्या गाड्यावर दोन गटात निर्माण झालेला किरकोळ वाद हाणामारीवर पोचल्यानंतर एका गटाने दुस-या गटातील दोघाजणांवर सु-याने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले. जुआरीनगर, कुठ्ठाळी येथे राहणाºया २५ वर्षीय प्रणव भराडे व २४ वर्षीय मुलायमसिंग यादव यांच्यावर दुसºया गटाने सु-याने हल्ला केल्याने ते जखमी झाले असून त्यांच्यावर बांबोळीच्या गोमॅकॉ इस्पितळात उपचार चालू आहेत. प्रणव व मुलायम यांच्यावर हल्ला केल्याप्रकरणात चार संशयित असून यापैंकी प्रमोद तोरस्कर (वय ३३, रा: सडा - मुरगाव) याला वास्को पोलीसांनी अटक केली असून त्या तिघांचा शोध चालू आहे.
वास्को पोलीसांनी दिलेल्या माहीतीनुसार गुरूवारी (दि.२९) मध्यरात्री २.३० च्या सुमारास सदर घटना घडली. सडा, मुरगाव भागात राहणारे प्रमोद तोरस्कर, पंकज नाईक, प्रकाश कांबळी व योगेश पाटील नावाचे चार तरुण मध्यरात्री वास्को रेल्वेस्थानका बाहेर असलेल्या एका गाड्यावर खाण्यासाठी गेले होते. ह्याच गाड्यावर झरींत, जुआरीनगर भागात राहणारे प्रणव भराडे व मुलायमसिंग यादव असे अन्य दोन तरुण खाण्यासाठी आले होते. ‘आम्ही येथे पूर्वी आलो असून त्यांना पूर्वी खाण्यास दिल्याने’ अशा किरकोळ विषयावरून ह्या दोन्ही गटात पूर्वी वाद सुरू झाला. यानंतर हे प्रकरण जास्तीवर पडून नंतर प्रमोद, पंकज, प्रकाश व योगेश यांनी प्रणव व मुलायम यांना शिवीगाळ करण्यास सुरवात करून त्यांची मारहाण करण्यास सुरवात केली. यावेळी प्रणव याच्या पोटावर तसेच मुलायम याच्या हातावर सुºयाने हल्ला करण्यात आल्याने त्यांना गंभीर जखमा झाल्याअसून नंतर त्यांना उपचारासाठी गोमॅकॉ इस्पितळात दाखल करण्यात आले.
सुरी हल्ल्यामुळे प्रणव याच्या पोटावर तर मुलायम याच्या हातावर गंभीर जखमा झालेल्या असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली. सदर प्रकरणाची माहीती पोलीसांना मिळताच त्यांनी मारहाण व सुरा हल्ला केल्या प्रकरणात प्रमोद, पंकज, प्रकाश व योगेश याच्याविरुद्ध भादस ५०४, ५०६, ३२४(२) आरडब्ल्यु ३४ कलमाखाली गुन्हा नोंद केला. मारहाण करून गायब झालेल्या ह्या प्रकरणातील प्रमोद यास गुरूवारी (दि.२९) संध्याकाळी पोलीसांनी गजाआड करून अटक केली असल्याची माहीती पोलीस उपनिरीक्षक डायगो ग्राशियस यांनी दिली. त्या चार जणापैंकी प्रणव व मुलायम याच्यावर नेमका सुरा हल्ला कोणी केला आहे हे अजून स्पष्ट झालेले नसून पोलीस याबाबत तपास करीत असलेतरी प्रकाश कांबळी यांनी सुरा हल्ला केला असल्याचा संशय सध्या पोलीसात निर्माण झाला आहे. दरम्यान सदर प्रकरणातील गायब असलेल्या अन्य तीन संशयितांचा वास्को पोलीस शोध घेत आहेत.
वास्को रेल्वे स्थानकाच्या बाहेर लावण्यात येणाºया खाण्याचे गाडे उशिरा मध्यरात्री पर्यंत चालत असून अनेक वेळा भांडणे अथवा विविध वादाचे विषय निर्माण होत असल्याच्या घटना यापूर्वी घडल्याचे दिसून आल्याची माहीती पोलीस सूत्रांनी दिली. मध्यरात्री एका गटाने दुसºया गटावर सुरी हल्ला केलेल्या प्रकरणानंतर वास्को पोलीस रात्री ११ नंतर येथे लावण्यात येत असलेले गाडे बंद करणार असल्याचे संकेत सध्या मिळत आहेत.