‘मिशन अ‍ॅडमिशन’ जटिल

By admin | Published: May 3, 2015 01:16 AM2015-05-03T01:16:15+5:302015-05-03T01:16:17+5:30

यंदा दहावीची परीक्षा दिलेल्यांत दीड हजार विद्यार्थी अधिक असल्यामुळे व बारावीची परीक्षा दिलेल्यांत साडेतीन हजार विद्यार्थी अधिक असल्यामुळे

'Mission Admissions' complex | ‘मिशन अ‍ॅडमिशन’ जटिल

‘मिशन अ‍ॅडमिशन’ जटिल

Next

‘मिशन अ‍ॅडमिशन’ जटिल
वासुदेव पागी ल्ल पणजी
यंदा दहावीची परीक्षा दिलेल्यांत दीड हजार विद्यार्थी अधिक असल्यामुळे व बारावीची परीक्षा दिलेल्यांत साडेतीन हजार विद्यार्थी अधिक असल्यामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशावेळी मोठी समस्या निर्माण होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांबरोबरच पालकांनाही ‘मिशन अ‍ॅडमिशन’ या वर्षी अधिक कठीण जाणार आहे.
दहावीची परीक्षा २०,५०० विद्यार्थ्यांनी दिली आहे. मागील वर्षाच्या संख्येपेक्षा दीड हजारांनी ही संख्या अधिक असल्याची माहिती गोवा शालान्त मंडळाचे सचिव भगीरथ शेट्ये यांनी दिली. ८५ टक्क्यांच्या आसपास निकाल लागत असल्यामुळे १७,५००च्या आसपास विद्यार्थी दहावीला उत्तीर्ण होतील. त्यामुळे निश्चितपणे अकरावी प्रवेशासाठी स्पर्धा वाढणार, असे संकेत आताच मिळू लागले आहेत. नामांकित उच्च माध्यमिक विद्यालयांत विज्ञान शाखेत किमान ८५ टक्के गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनाच प्रवेश अर्ज दिले जात होते. मडगावमधील काही नामवंत उच्च माध्यमिक विद्यालयांत आवश्यक टक्केवारी ही ९० टक्के करण्यात आली होती. यंदा प्रवेश घेणारे विद्यार्थी वाढणार असल्यामुळे आवश्यक किमान टक्केवारीही (कटआॅफ) वाढण्याचे संकेत आहेत.
‘चौगुले’त प्रवेश बंद
प्रवेशाची समस्या उद्भवण्याचे संकेत मिळत असतानाच चौगुले उच्च माध्यमिक विद्यालयात यंदापासून अकरावीसाठी प्रवेश दिले जाणार नाहीत. या विद्यालयात प्रवेश घेण्यासाठी इच्छुक असलेल्या विद्यार्थ्यांना आता इतर ठिकाणी जावे लागणार आहे. चौगुले उच्च माध्यमिक विद्यालयात येत्या शैक्षणिक वर्षात केवळ बारावीचे वर्ग चालतील.
खात्यातर्फे पूर्वतयारी : शिक्षण संचालक
यंदा दहावीला अधिक विद्यार्थी असल्यामुळे अकरावीला प्रवेशासाठी अधिक विद्यार्थी असतील, याची आपल्याला जाणीव असल्याचे शिक्षण संचालक गजानन भट यांनी सांगितले. गोवा शालान्त मंडळाकडून विद्यार्थ्यांची संख्याविषयक माहिती मिळविलेली आहे. त्यानुसार उपाययोजनाही चालविल्या आहेत. मडगावच्या चौगुले उच्च माध्यमिक विद्यालयात प्रवेश दिले जाणार नसले तरी, मडगावच्या इतर उच्च माद्यमिक विद्यालयांत आवश्यक त्या प्रमाणात जागा वाढवून देण्यात येणार आहेत, अशी माहिती भट यांनी दिली.

Web Title: 'Mission Admissions' complex

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.