आमदार मोन्सेरात गोमेकॉत दाखल, विविध चाचण्या सुरू
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 02:49 PM2020-07-23T14:49:00+5:302020-07-23T14:52:48+5:30
बाबूश यांना गुरुवारी अचानक घेरी आली. त्यामुळे त्यांना मानेची काही समस्या आहे काय, त्यांना वर्टिगोचा त्रास होत आहे काय याचा अंदाज डॉक्टरानी घेतला.
पणजी : पणजीचे भाजपा आमदार बाबूश मोन्सेरात यांना गुरुवारी सकाळी तातडीने बांबोळीच्या गोमेकॉ इस्पितळात दाखल करावे लागले. मोन्सेरात यांची प्रकृती आता स्थिर आहे. त्यांच्या आवश्यक त्या विविध चाचण्या डॉक्टरांकडून केल्या जात आहेत.
बाबूश यांना गुरुवारी अचानक घेरी आली. त्यामुळे त्यांना मानेची काही समस्या आहे काय, त्यांना वर्टिगोचा त्रास होत आहे काय याचा अंदाज डॉक्टरानी घेतला. महापौर उदय मडकईकर यांनी दुपारी गोमेकॉ इस्पितळाला भेट दिली. मोन्सेरात यांना डॉक्टरानी निरीक्षणाखाली ठेवले आहे. त्यांच्या चाचण्या केल्या जात आहेत. त्यांचा रक्तदाब मुळीच वाढलेला नाही. कदाचित त्यांना उद्या शुक्रवारी देखील इस्पितळातून डिस्चार्ज दिला जाऊ शकतो असे मडकईकर यांनी स्पष्ट केले. सांताक्रुझचे आमदार टोनी फर्नांडिस यांनीही गोमेकॉला भेट दिली.
मोन्सेरात हे मनोहर पर्रीकर यांच्या निधनानंतर पणजी मतदारसंघात झालेल्या पोटनिवडणुकीत काँग्रेसच्या तिकिटावर निवडून आले होते. ते मग काही महिन्यांनी अचानक भाजपामध्ये गेले. मोन्सेरात यांना एरव्ही डायबेटिस किंवा उच्च रक्तदाबाची समस्या नाही. ग्रेटर पणजी पीडीएचे ते चेअरमन आहेत व त्यांची पत्नी जेनिफर मोन्सेरात ही विद्यमान सरकारमध्ये महसूलमंत्री आहे.
आणखी बातम्या...
"छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाला असता तर तिथेच राजीनामा दिला असता"
बापरे! पत्नीचे 14 जणांसोबत शारीरिक संबंध; पतीने पाठवली सर्वांना कायदेशीर नोटीस अन्...
राम मंदिराचे भूमिपूजन अशुभ मुर्हूतावर? शंकराचार्य स्वरूपानंद सरस्वतींकडून प्रश्नचिन्ह
जोपर्यंत शाळा बंद आहेत, तोपर्यंत फी नाही; गुजरात सरकारचा पालकांना दिलासा
मृत्यूनंतरही आठ लोकांसाठी ठरला फरिश्ता; २७ वर्षीय तरुणाचे अवयवदान
"मी म्हणजे ट्रम्प नाही..." उद्धव ठाकरेंच्या अनलॉक मुलाखतीचा प्रोमो रिलीज