आमदार आले पण कार्यकर्त्यांची पाठ, दक्षिण गोव्यात भाजपला बसला फटका

By ऑनलाइन लोकमत | Published: June 6, 2024 03:30 PM2024-06-06T15:30:55+5:302024-06-06T15:31:08+5:30

प्रकाश वेळीप यांचे स्पष्टीकरण

MLAs came but the back of workers, BJP suffered in South Goa | आमदार आले पण कार्यकर्त्यांची पाठ, दक्षिण गोव्यात भाजपला बसला फटका

आमदार आले पण कार्यकर्त्यांची पाठ, दक्षिण गोव्यात भाजपला बसला फटका

नारायण गावस, पणजी-गोवा: कॉँग्रेसमधून भाजपमध्ये आमदार आले पण त्यांचे कार्यकर्ते आलेच नाही. जे आमदार भाजपमध्ये आले त्या मतदारसंघात भाजपला मते कमी तर कॉँग्रेसलाच जास्त मिळाली आहे. म्हणून दक्षिण गोव्यात भाजपच्या उमेदवार पडल्या, असे स्पष्टीकरण उटाचे अध्यक्ष तसेच भाजपचे नेते प्रकाश वेळीप यांनी निवडणूकांच्या निकालावर दिले.

 भाजपचे सर्व कार्यकर्ते आमदार सर्वांनी काम चांगले केले हाेते. मुख्यमंत्र्यांनी पंचायत पातळीवर दक्षिण गाेव्यात प्रचार केला होता. पण काही आमदार काॅँग्रेसमधून भाजपमध्ये गेल्याने त्यांच्या कार्यकर्त्यांनी भाजपला मतदार केले नसावे. आम्ही दक्षिण गोव्यात भाजपचा उमेदवार जिंकून आणण्यास कुठे कमी पडलो याची कारणे शोधली जाणार आहे.

दक्षिण गोव्यात फक्त दाेन वेळा भाजपचा उमेदवार निवडून आला आहे.  दक्षिण गोव्यात बहुतांश अल्पसंख्याक लाेक मगाे तसेच भाजप पक्षाला मतदान करत नाही हे अगोदर पासून सिद्ध  झाले आहे. पण आमच्या एसटी बांधवांनी माेठ्या प्रमाणात भाजपला मतदान केले आहे. केेपे, काणकोण सारख्या ग्रामीण तालुक्यात भाजपला मते  मिळाली पण सासष्टी सारख्या शहरी तालुक्यात भाजपला मतदान कमी मिळाले आहे. याचाही विचार हाेणे गरजेचा आहे. एवढा प्रचार करुन मते का कमी मिळाली याची कारणे शोधली जाणार आहे.  

भाजपच्या उमेदवार पल्लवी धेंपो तसेच मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्ष तसेच सर्व मंत्री आमदार कार्यकर्त्यांनी दक्षिण गोव्यात माेठ्या प्रमाणात प्रचार केला होता. सर्व बुथवर कार्यकर्त्यांनी बैठका घेतल्या. तसेच सर्व लोकापर्यंत संपर्क साधला आम्ही सर्वांनी चांगले काम केलेले आहे. पण पराभव का झाला याचे परीक्षण केले जाणार आहे.

Web Title: MLAs came but the back of workers, BJP suffered in South Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा