मोबाईल चोरट्यास रेल्वे स्थानकावर अटक; संशयिताकडून ४ फोन, घडयाळ, २ एटिएम कार्ड जप्त
By काशिराम म्हांबरे | Published: May 18, 2024 04:28 PM2024-05-18T16:28:27+5:302024-05-18T16:31:36+5:30
संशयिताकडून ४ मोबाईल फोनसहित ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
काशिराम म्हांबरे, म्हापसा: थिवी येथील रेल्वे स्थानकावरून पळून जाण्याच्या तयारीत असताना कोलवाळ पोलिसांनी संशयित प्रथमेश सैखेडकर ( वय २४, सहकार नगर, नागपूर) यास अटक केली आहे. संशयिताकडून ४ मोबाईल फोना सहित ३ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
निरीक्षक विजय राणे यांनी दिलेल्या माहितीनुसार आज पहाटे दरम्यान त्याला अटक करण्यात आली. संशयिताने कळंगुट येथील समुद्रकिनाऱ्यावर आलेल्या लोकांच्या बॅगात ठेवण्यात आलेल्या या वस्तूंची चोरी केली होती. चरी करण्याच्या उद्देशानेच तो गोव्यात काही दिवसापूर्वी आला होता.
संशयिताकडून ४ फोन, घडयाळ, २ एटिएम कार्ड ही जप्त करण्यात आले आहे. अटक करून त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने ४ दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे. पुढील तपास कार्य निरीक्षकांच्या नेतृत्वाखाली सुरु करण्यात आले आहे.