मोदींचा मतांचा हिस्सा 10 टक्क्यांनी उतरला - अरविंद केजरीवाल
By Admin | Published: June 30, 2016 09:37 PM2016-06-30T21:37:20+5:302016-06-30T21:51:28+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले अनेक यू टर्न, त्यांच्या पक्षाने केलेली गुंडागर्दी, धर्माध वर्तन यामुळे 31 टक्के मते मिळवून सत्तेवर असलेल्या या पक्षाचा मतांचा हिस्सा आजच आठ
- राजू नायक
पणजी, दि. ३० - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेले अनेक यू टर्न, त्यांच्या पक्षाने केलेली गुंडागर्दी, धर्माध वर्तन यामुळे 31 टक्के मते मिळवून सत्तेवर असलेल्या या पक्षाचा मतांचा हिस्सा आजच आठ ते 10 टक्क्यांनी घसरला आहे, असे मत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आज गोव्यातील संपादकांशी केलेल्या वार्तालापात व्यक्त केले.
पंतप्रधान बनण्याची माझी महत्त्वाकांक्षा नाही. मला राष्ट्रीय पातळीवर कोणतेही ध्येय नाही. दिल्लीत माङयाकडे सोपविलेले काम मला इमानेइतबारे पार पाडायचे आहे. माझ्या मार्गात अनेक अडथळे आणले जात आहेत. सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न भाजपाने चालविले आहेत; कारण भाजपाला आप हाच राजकीय पर्याय म्हणून उभा राहील याची भीती वाटते.
केजरीवाल पुढे म्हणाले, जवाहि-यांवर 12 टक्के अबकारी कर लागू करण्यात आला तेव्हा सुरत येथील जवाहिरे व्यापा-यांचे प्रतिनिधी जयलाल मला भेटायला आले व त्यांनी माझी सभा दक्षिण गुजरातमधील विद्यापीठात आयोजित केली. परंतु त्या संकुलात माझी सभा होऊ नये म्हणून गुजरात सरकारने विद्यापीठावर दबाव आणून सभा होऊ दिली नाही. आपवर भाजपाचा ब संघ असा आरोप होत असला तरी भाजपाच आपला घाबरून आहे. जेव्हा काँग्रेस नेत्यांना नरेंद्र मोदींवर आरोप, टीका करायला धैर्य नाही, तेव्हा मीच त्यांच्या पदवीचा व इतर प्रश्न लावून धरले. काही जण आम्हाला कॉँग्रेसचा ब संघ म्हणतात; परंतु मीच रॉबर्ट वधरा यांच्यावर जहाल टीका केली आहे.
ह्यआपह्णबद्दल अपप्रचार करण्यात प्रसार माध्यमांमधील काही घटक आघाडीवर आहेत. मोदी सरकारची दोन वर्षे पूर्ण झाल्यावर इंडिया गेटवरील कार्यक्रमाचे प्रक्षेपण पाच तास चालले होते. आम्हाला थोडी तरी प्रसिद्धी द्या, असे आम्ही मागतो. ही माध्यमे ह्यआपह्णबद्दल खोटय़ानाटय़ा गोष्टी पुन्हा पुन्हा सांगून लोकांना विश्वास ठेवायला भाग पाडत आहेत, असे सांगून केजरीवाल पुढे म्हणाले, दिल्ली सरकारने जाहिरातबाजीवर 526 कोटी रुपये खर्च केले असे ती पुन्हा पुन्हा सांगतात. प्रत्यक्षात आम्ही केवळ 75 कोटी रुपये खर्च केले असून आमच्या सरकारच्या सर्व खात्यांचा जाहिरात खर्च पंतप्रधानांच्या कपडय़ांच्या खर्चापेक्षा कमी आहे.
पंतप्रधान मोदींचा प्रत्येक ड्रेस दोन लाख रुपये किमतीचा असतो. ते दिवसाला पाच वेळा कपडे बदलतात. दिवसाचा त्यांचा कपडय़ांवरचाच खर्च 10 लाख रुपये जमेस धरता 700 दिवसांचा त्यांचा कपडय़ांवरचा खर्च 70 कोटी रुपये होतो. त्या तुलनेने दिल्ली सरकारचा एकूण जाहिरातींवरचा खर्च कमीच आहे,ह्णह्ण असे केजरीवाल यांनी उद्वेगाने म्हटले. मोदी एकदा परिधान केलेला ड्रेस परत वापरत नाहीत. त्यांचे नेटवरील फोटो पाहा, एकही कपडा त्यांच्या अंगावर पुन्हा दिसणार नाही, ते उत्तरले.
दिल्लीच्या आमदारांचा पगार 400 टक्क्यांनी वाढविण्याची आमच्यावर टीका होते; परंतु आमदारांचा पगार 12 हजार होता. तो आम्ही 50 हजार केला. या आमदारांच्या मागे, त्यांनी कोणताही गैरव्यवहार करू नये म्हणून आम्ही तीन-चार माणसे नेमली आहेत. पूर्णवेळ राबणा-या आमदाराला घर चालविण्यासाठी तरी 50 हजार रुपये मिळायलाच हवेत, असे ते म्हणाले.
आम्हाला निवडणुकीत हरविण्यासाठी प्रसार माध्यमांमधील काही घटकांनी प्रयत्नात कोणतीही कसर सोडली नव्हती, असे ते पुढे म्हणाले. परंतु लोकांना आमचे काम माहीत आहे.