पणजी महापौरपदी उदय मडकईकर तर उपमहापौरपदी पाश्कोला माश्कारेन्हस 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2019 02:03 PM2019-03-13T14:03:47+5:302019-03-13T14:10:07+5:30

बाबूश मोन्सेरात गटाचे उदय मडकईकर आणि पाश्कोला माश्कारेन्हस यांची अनुक्रमे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 

Monserrate panel selects Madkaikar for CCP Mayor's post | पणजी महापौरपदी उदय मडकईकर तर उपमहापौरपदी पाश्कोला माश्कारेन्हस 

पणजी महापौरपदी उदय मडकईकर तर उपमहापौरपदी पाश्कोला माश्कारेन्हस 

Next
ठळक मुद्देसंख्याबळ नसल्याने भाजपाने पणजी महापालिका महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. बाबूश मोन्सेरात गटाचे उदय मडकईकर आणि पाश्कोला माश्कारेन्हस यांची अनुक्रमे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली.३0 सदस्यीय महापालिकेत सध्या भाजप-१२, बाबुश गट-१५ व फुर्तादो पती- पत्नी आणि रुपेश हळर्णकर मिळून ३ असे संख्याबळ आहे. 

पणजी - संख्याबळ नसल्याने भाजपाने पणजी महापालिका महापौर, उपमहापौर पदाच्या निवडणुकीत न उतरण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे बाबूश मोन्सेरात गटाचे उदय मडकईकर आणि पाश्कोला माश्कारेन्हस यांची अनुक्रमे महापौर, उपमहापौरपदी बिनविरोध निवड निश्चित झाली आहे. 

बुधवारी (13 मार्च) दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज सादर करण्याची मुदत आहे. माजी आमदार सिद्धार्थ कुंकळ्येंकर यांनी भाजपा नगरसेवकांची आज सकाळी बैठक घेतली. त्यानंतर पत्रकार परिषदेत बोलताना नगरसेवक मिनिन डीक्रूज यांनी कुंकळ्येंकर यांच्या उपस्थितीत ही माहिती देण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी ११ वाजता निवड जाहीर होईल. 

मंगळवारी सायंकाळी उशिरा मोन्सेरात यांनी दोनापॉल येथील सिदाद द गोवा हॉटेलमध्ये आपल्या गटाच्या नगरसेवकांची बैठक घेतली. या बैठकीला बाबुश गटाचे १२ नगरसेवक उपस्थित होते. सोराया पिंटो माखिजा, मार्गारेट आणि दिनेश साळगांवकर हे तीन नगरसेवक उपस्थित राहू शकले नाहीत. दोन्ही पदांवर नवे चेहरे देणार असल्याचे संकेत बाबुश यांनी आधीच दिले होते त्याप्रमाणे महापौर, उपमहापौरपदी त्यांनी नवे चेहरे दिले आहेत.

३0 सदस्यीय महापालिकेत सध्या भाजप-१२, बाबुश गट-१५ व फुर्तादो पती- पत्नी आणि रुपेश हळर्णकर मिळून ३ असे संख्याबळ आहे. उदय मडकईकर हे गेल्या वर्षीही महापौरपदासाठी उत्सुक होते. परंतु बाबुश यांनी त्यांना अखेरच्या क्षणी बाजुला काढले आणि विठ्ठल चोपडेकर यांची वर्णी लावली. या घटनेनंतरही मडकईकर यांनी कोणताही किंतू मनात न ठेवता गेले वर्षभर चोपडेकर यांना सहकार्य केले. महापालिकेच्या बैठकांमध्ये ते नेहमी चोपडेकर यांच्या पाठिशी ठामपणे असायचे. 

बाबुश मोन्सेरात यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की, ‘नगरसेवकांशी चर्चा करुन महापौरपदासाठी उदय मडकईकर आणि उपमहापौरपदासाठी पाश्कोला माश्कारेन्हस यांची नावे मी जाहीर केलेली आहेत. महापालिका आयुक्त पदावर स्थानिक अधिकारीच असावा अशी विनंती मी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन करणार आहे. मंगळवारी मी माजी आमदार कुंकळ्येंकर यांनाही भेटलो आणि पणजीच्या विकासासाठी एकत्र काम करू,असे सांगितले.', असे बाबूश पुढे म्हणाले.

Web Title: Monserrate panel selects Madkaikar for CCP Mayor's post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.