मान्सूनची गोव्यासह देशातूनही एक्झिट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 11:04 AM2023-10-20T11:04:06+5:302023-10-20T11:04:55+5:30
सामान्यवेळेपेक्षा गोव्यातून तब्बल ८ दिवस तर देशातून ४ दिवस उशिराच मान्सून यंदा हटला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : नैऋत्य मान्सूनने शेवटी गोव्यातून आणि भारतीय उपखंडातूनही निरोप घेतल्याचे भारतीय हवामान खात्याने जाहीर केले आहे. सामान्यवेळेपेक्षा गोव्यातून तब्बल ८ दिवस तर देशातून ४ दिवस उशिराच मान्सून यंदा हटला आहे.
सप्टेंबरपासून सुरू होत असतो. परंतु यंदा परतीचा प्रवास हा दिवस उशिरा म्हणजेच २५ सप्टेंबरपासून सुरू झाला होता. ३ ते ५ ऑक्टोबर यांदरम्यान गुजरातमधून मान्सून माघारी फिरला तर महाराष्ट्रातून ९ ऑक्टोबरपर्यंत मान्सून परतला. नैऋत्य मान्सूनचा परतीचा प्रवास हा राजस्थानमधून सामान्यतः १७ ऑक्टोबरपासून होतो. नऊ ऑक्टोबरनंतर मान्सूनच्या हाचालींची हवामन खात्यानेही वेबसाईटवर अपडेट दिली नाही.
कारण या दरम्यानच्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावर चक्रीय वारे निर्माण होऊन त्याचे कमी दाबाच्या पट्ट्यातही रुपांतर झाले होते. त्यामुळे गोव्यासह दक्षिणी राज्यात पावसाच्या सरी कोसळल्या. हवेत ओलावाही मोठ्या प्रमाणावर राहिला. त्यामुळे मान्सूनचा मुक्काम वाढला होता. परंतु त्यानंतर वाऱ्याच्या दिशेत झालेले बदल आणि हवेतील कोरडापणा या निकषांवरून मान्सून गोव्यासह भारतीय उपखंडातून हटल्याचे हवामान खात्याने जाहीर केले आहे.
गोव्याला भरभरून दिले
नैऋत्य मान्सूनने यंदा देशात कमीच वर्षाव केला. संपूर्ण देशात सरासरी १२ टक्के मान्सून तूट आढळून आली. गोव्याबाबत मात्र वेगळेच घडले. गोव्यात ६.५ टक्के अतिरिक्त पाऊस पडला. जून महिन्यात जोरदार पाऊस पडला आणि सप्टेंबरच्या अखेरीसही जोरदार बरसला. त्यामुळे यंदा मान्सूनने गोव्याला भरभरून दिले असे म्हणावे लागेल.