गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून; मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 03:55 PM2024-06-13T15:55:25+5:302024-06-13T15:57:37+5:30
गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होणार असून साधारणपणे २१ दिवसांचे कामकाज असेल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली.
पणजी :गोवा विधानसभेचे पावसाळी अधिवेशन १५ जुलैपासून सुरू होणार असून साधारणपणे २१ दिवसांचे कामकाज असेल, अशी माहिती मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी दिली. या अधिवेशनात अर्थसंकल्पावर चर्चा होणार असून अर्थसंकल्प मंजूर केला जाईल तसेच अनेक महत्वाची सरकारी विधेयकेही कामकाजात येणार आहेत.
पावसाळी अधिवेशन दीर्घकालीन असावे अशी विरोधी आमदारांची नेहमीच मागणी राहिलेली आहे. प्रश्न विचारण्यास पुरेसा वेळ मिळावा तसेच सरकारी विधेयके संमत करताना त्यावर सखोल चर्चा व्हावी, यासाठी विधानसभा कामकाजाचा कालावधी दीर्घ असावा असे विरोधकांचे म्हणणे आहे. गेल्या वर्षीही पावसाळी अधिवेशन दीर्घ काळाचे झाले होते.