मोपा जमीन घोटाळा ‘सेझ’पेक्षाही मोठा!

By admin | Published: October 15, 2014 01:31 AM2014-10-15T01:31:53+5:302014-10-15T01:32:50+5:30

पणजी : मोपा येथील जमीन घोटाळा हा एसईझेडच्या जमीन घोटाळ्यापेक्षाही अनेकपटीने मोठा आहे, असा दावा फादर एरमित रिबेलो व अन्य दाबोळी समर्थक आंदोलकांनी मंगळवारी केला.

Mopa land scam bigger than 'SEZ'! | मोपा जमीन घोटाळा ‘सेझ’पेक्षाही मोठा!

मोपा जमीन घोटाळा ‘सेझ’पेक्षाही मोठा!

Next

पणजी : मोपा येथील जमीन घोटाळा हा एसईझेडच्या जमीन घोटाळ्यापेक्षाही अनेकपटीने मोठा आहे, असा दावा फादर एरमित रिबेलो व अन्य दाबोळी समर्थक आंदोलकांनी मंगळवारी केला.
एसईझेडचा जमीन घोटाळा हा तीन लाख चौरस मीटर जमिनीशी संबंधित होता. मोपा विमानतळ जमीन घोटाळा आठ लाख चौरस मीटर जमिनीशी संबंधित असून तो शासकीय घोटाळा आहे, असे रिबेलो म्हणाले. चार एफआर देऊन एकूण ३८१ एकर जमीन मोपाच्या नावाखाली एखाद्या खासगी कंपनीला देण्याचा घाट सरकारने घातला आहे. सरकारने जारी केलेला आरएफक्यू वाचल्यानंतर ते स्पष्ट होते. व्यावसायिक वापरासाठी ही जमीन दिलेली असल्याने या जमिनीची किंमत एकूण बारा हजार कोटी रुपये होते. शेतकऱ्यांना फसवून त्यांची जमीन सरकारने ताब्यात घेतली व हजारो कोटींची ही जमीन आता खासगी कंपनीला दिली जाणार आहे. सरकारचा अंतस्थ हेतू काय आहे, ते यावरून लोकांनी पाहावे, असे रिबेलो व राजेंद्र काकोडकर म्हणाले.
(खास प्रतिनिधी)

Web Title: Mopa land scam bigger than 'SEZ'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.