बायणा येथील आणखी १२१ बांधकामांवर येणार संक्रांत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2016 01:46 AM2016-04-20T01:46:58+5:302016-04-20T01:51:20+5:30

पणजी : बायणा किनाऱ्यावरील आणखी १२१ बेकायदा बांधकामांवर संक्रांत आली आहे. ही बांधकामे पाडावी की नाही, याविषयी

More 121 constructors of Baina will come under construction | बायणा येथील आणखी १२१ बांधकामांवर येणार संक्रांत

बायणा येथील आणखी १२१ बांधकामांवर येणार संक्रांत

Next

पणजी : बायणा किनाऱ्यावरील आणखी १२१ बेकायदा बांधकामांवर संक्रांत आली आहे. ही बांधकामे पाडावी की नाही, याविषयी गोवा किनारी क्षेत्र व्यवस्थापन प्राधिकरण (जीसीझेडएमए) निर्णय घेणार आहे.
बायणा किनाऱ्यावरील बरीच बेकायदा बांधकामे यापूर्वी पाडण्यात आली आहेत. तथापि, दक्षिण गोवा जिल्हाधिकाऱ्यांनी आता नव्याने सर्वेक्षण करून बायणा किनाऱ्यावरील बांधकामांबाबतचा नवा अहवाल जीसीझेडएमएला सादर केला आहे. त्यानुसार १२१ बांधकामे बायणा किनारपट्टीवर बेकायदा असल्याचे दाखवून देण्यात आले आहे. जीसीझेडएमएच्या नुकत्याच झालेल्या बैठकीवेळी हा अहवाल चर्चेस आला; पण त्यावर कोणताच निर्णय पुरेशा वेळेअभावी होऊ शकला नाही. या बांधकामांविरुद्ध कारवाई करावी, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सुचविले आहे.
(खास प्रतिनिधी)

Web Title: More 121 constructors of Baina will come under construction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.