सेनेचे आमदार पोहोचताच गोव्याच्या सीमा 'सील'; वाहनांची कसून तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 30, 2022 12:26 AM2022-06-30T00:26:09+5:302022-06-30T00:30:48+5:30

दोनापॉल येथील ताज कन्वेंशन हॉटेलमध्ये कडेकोट पोलिस बंदोबस्त

more police Protection on Goa border as soon as shiv Sena MLAs arrive; Thorough inspection of vehicles | सेनेचे आमदार पोहोचताच गोव्याच्या सीमा 'सील'; वाहनांची कसून तपासणी

सेनेचे आमदार पोहोचताच गोव्याच्या सीमा 'सील'; वाहनांची कसून तपासणी

Next

पणजी : एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्त्वाखालील शिवसेनेचे ४९ बंडखोर आमदार गुवाहाटीहून रात्री  उशिरा गोव्यात झाले आहेत.

दोनापॉल येथील ताज कन्वेंशन या पंचतारांकित हॉटेलमध्ये रात्री सव्वा अकरा वाजता हे आमदार पोचले. त्यांच्यासाठी ७१ खोल्या आरक्षित करण्यात आल्या असून उद्या गुरुवारी महाराष्ट्र विधानसभेत बहुमत सिध्द करायचे असल्याने बंडखोर आमदार उद्या सकाळीच मुंबईला रवाना होतील, अशी माहिती मिळते.

दोनापावला येथील सिदाद दी गोवा हे तिंंबलो समुहाचे हॉटेल असून त्याचा काही भाग हा ताज कन्वेंशन या हॉटेलने घेतला आहे. यात सुमारे ३00 खोल्या असून त्यापैकी ७१ खोल्या बंंडखोर आमदारांंसाठी आरक्षित करण्यात आल्या आहेत. मात्र त्यावर अधिकृतरित्या कुठल्याही राजकीय पक्षाने विधान केलेले नाही. हॉटेल परिसरात पोलिसांंनी ठेवलेल्या चोख बंंदोबस्तामुळे शिवसेनेचे बंंडखोर नेते या हॉटेलात दाखल होणार असल्याची चर्चा आहे. हॉटेलला छावणीचे स्वरुप आले असून कोणालाही आत सोडले जात नाही.

गोव्यात राजकीय उलथापथली नवीन नाहीत. मात्र महाराष्ट्रातील बंंडखोर आमदार गुवाहाटी येथून गोव्यात येत असल्याने सध्या गोव्यालाही महाराष्ट्रातील राजकारणावरुन महत्व प्राप्त झाले आहे. त्यामुळे देशभरातील लोकांच्या नजरा या राजकीय घडमोडींंकडे लागू राहिल्या आहेत.
                            पत्रादेवी चेक नाक्यावर
                           वाहनांची कडक तपासणी

दरम्यान, शेजारी महाराष्ट्रातील शिवसैनिकांनी गोव्यात येऊन निदर्शने करु नयेत यासाठी पत्रादेवी चेकनाक्यावर तसेच दोडामार्ग, सातार्डा व आरोंदा चेकनाक्यांवर कडक पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. गोव्यात प्रवेश करणाºया वाहनांची कसून तपासणी केली जात आहे.

Web Title: more police Protection on Goa border as soon as shiv Sena MLAs arrive; Thorough inspection of vehicles

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.