कर्जाचे डोंगर; आश्वासनांना हरताळ!
By admin | Published: July 30, 2015 02:08 AM2015-07-30T02:08:32+5:302015-07-30T02:08:42+5:30
पणजी : अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह अपक्ष आमदारांनी वेगवेगळ््या प्रश्नांवरून सरकारची निष्क्रियता उघडी पाडली.
पणजी : अर्थसंकल्पावरील चर्चेत विरोधी पक्षनेते प्रतापसिंग राणे यांच्यासह अपक्ष आमदारांनी वेगवेगळ््या प्रश्नांवरून सरकारची निष्क्रियता उघडी पाडली. मांडवी नदीला तिसऱ्या पुलाची गरजच काय, असा सवाल करून आधी जुवारीवर समांतर पूल बांधा, असा सल्ला राणे यांनी दिला. बांधकाम, आरोग्य, कृषी, पशुसंवर्धन, पाटबंधारे, वीज, उद्योग आदी क्षेत्रांतील विषयांना स्पर्श करताना सरकार जनतेच्या अपेक्षा पूर्ण करू शकलेले नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
राणे म्हणाले, राज्य सरकारच्या डोक्यावरील कर्ज १३ हजार कोटी रुपयांवर पोचले आहे. बांधकाम खाते नवे रस्ते, पूल हाती घेते; परंतु या प्रकल्पाचे काम नेमके पूर्ण कधी होणार, याची शाश्वती नसते. जुने गोवे चौपदरी मार्ग पवित्र शवप्रदर्शनापूर्वी होणार होता. मात्र, तो अजूनही रखडलेला आहे. खरी गरज जुवारीवर समांतर पुलाची होती. हा पूल १५ वर्षांपेक्षा जुना आहे. त्याचे आयुष्य संपलेले आहे. त्यामुळे तेथे प्राधान्यक्रमे पूल येणे आवश्यक होते; परंतु सरकार दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका त्यांनी केली. साखळी येथे भूमिगत मलनिस्सारण वाहिन्या टाकण्याचे काम अजून का सुरू होत नाही, असा सवाल राणे यांनी केला.
(पान २ वर)