गोव्यात पर्रीकरांना पर्याय देण्याच्या हालचाली
By ऑनलाइन लोकमत | Published: December 9, 2018 02:12 AM2018-12-09T02:12:55+5:302018-12-09T02:13:18+5:30
कर्करोगाने गंभीर आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांना पर्याय देण्याचा विचार सुरू झालेला आहे.
पणजी : कर्करोगाने गंभीर आजारी असलेले गोव्याचे मुख्यमंत्रीमनोहर पर्रीकर यांना पर्याय देण्याचा विचार सुरू झालेला आहे. पाच राज्यांचे निकाल जाहीर झाल्यानंतर येत्या मंगळवारी, ११ तारखेनंतर यासंदर्भात वेगात होतील, असे समजते.
मुख्यमंत्री पर्रीकर आपल्याकडील अतिरिक्त खाती सर्व मंत्र्यांना देण्यासाठी तयार होते; पण भाजपाच्या नेतृत्वाने खातेवाटप थांबविले. गोव्यात नेतृत्व बदल करावाच लागेल व त्यामुळे खात्यांचे वाटप अगोदरच करणे निरर्थक ठरेल, असा विचार नेतृत्वाने केला. मुख्यमंत्री आजारी असल्याने व नोकरशाही कोणाचेही ऐकेनाशी झाली आहे. त्यामुळे मंत्रीही हतबल आहेत. पर्रीकर यांच्या आरोग्याची माहिती सार्वजनिक करता येणार नाही, अशी भूमिका सरकारने मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर घेतली. मुख्य सचिवांच्या प्रतिज्ञापत्रात पर्रीकर यांच्या आरोग्याच्विषयी उल्लेख नाही.