पावसाळा लांबला की एक महिना पुढे सरकला?
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2017 04:19 PM2017-10-16T16:19:29+5:302017-10-16T16:20:33+5:30
ऋतुचक्रानुसार पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात परतीचा पाऊस गुजरातमध्येच अडकला आहे. देशातील बहुतेक भागात नैऋत्य मान्सून सक्रीय आहे.
पणजी : ऋतुचक्रानुसार पावसाळा संपून हिंवाळा सुरू झाला असला तरी प्रत्यक्षात परतीचा पाऊस गुजरातमध्येच अडकला आहे. देशातील बहुतेक भागात नैऋत्य मान्सून सक्रीय आहे. तसेच 1 जूनला केरळ किनारपट्टीला धडक देणारा पाऊसही आता लांबतोय याचा निष्कर्श हवामान शास्त्रज्ञ एकच काढतात, आणि तो म्हणजे मान्सून पुढे सरकतो आहे.
अंदमान निकोबार द्वीपसमुहावर पाऊस महासागरातून पुढे गेलेला पाऊस नैऋत्य दिशेला वळसा घेऊन साधारणत: १ जून रोजी केरळ किनारपट्टीला धडक देतो आणि नंतर गोव्यात ५ ते ६ जूनपर्यंत पोहोचतो हे सामान्य चित्र होते. परंतु मागील काही वर्षांपासून हे चित्र बदलताना दिसत आहे. मान्सुनचे आगमनही उशिरा होत आहे आणि मान्सूनचा परतिचा प्रवासही उशिरा होत आहे. म्हणजेच पावसाळा काही प्रमाणआत पुढे सरकरला आहे.
२०११ मध्ये मान्सूनचे केरळमध्ये आगमन २९ मे रोजी झाले होते तर २०१२ मध्ये ४ जूनला, २०१३ मध्ये २ जूनला , २०१४ रोजी ६ जूनला, २०१५ मध्ये ७ जूनला तर २०१६ मध्ये ८ जूनल असे चढत्या क्रमाणे लांबणीवर आगमन झाल्याचे हवामान खात्याची माहिती स्पष्ट करीत आहे. २०१७ मध्ये १ जूनला केरळात जोरदार पाऊस पडला. एल निनो चक्रिवादळाच्या प्रभावाचा तो परिणाव होता. कारण मान्सून गोव्यात सामान्य वेळेपेक्षा उशिराच पोहोचला. म्हणजेच मान्सूनचे आगमन मागील किमान ६ वर्षात उशिराच होत आहे.
'अलिकडील काही वर्षांत मान्सूनच्या आगमनाच्या आणि पूर्णपणे माघार घेण्याच्या तारखात बदल दिसून येत आहे. २०११ मध्ये २९ मे रोजी केरळात पोहोचलेला मान्सून २०१६ मध्ये ८ जूनला धडकतो. तसेच मान्सूनचा परतीचा प्रवासही मागील काही वर्षांत लांबत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे मान्सून पुढे सरकल्याचे आपण म्हणू शकतो असे हवामान खात्याच्या पणजी केंद्राचे संचालक एम एल साहू यांनी सांगितले'
वर्ष आगमन संपला
२०१६ ८ जून २८ ऑक्टोबर
२०१५ ७ जून १९ ऑक्टोबर
२०१४ ६ जून १८ ऑक्टोबर
२०१३ २ जून २१ ऑक्टोबर
२०१२ ४ जून १६ ऑक्टोबर
२०११ २९ मे २४ ऑक्टोबर