खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2024 15:29 IST2024-06-08T15:29:17+5:302024-06-08T15:29:25+5:30
ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे.

खासदार कॅप्टन विरियातो समाजाला न्याय देणार, राज्यातील समाज कार्यकत्यांचा विश्वास
नारायण गावस -
पणजी: कॅप्टन विरियातो फर्नांडिस हा समाज कार्यकर्ता असून दक्षिण गोव्यातील लोकांनी त्यांना निवडून दिल्याने राज्यातील समाज कार्यकर्त्यांनी मतदारांचे आभार मानले. विरियातो हे समाज कार्यकर्ता असल्याने राज्यातील विविध विषय ते लोकसभेत मांडणार आहेत, असा विश्वास समाज कार्यकर्त्यांनी व्यक्त केला. शनिवारी पणजीत आयाेजित केलेल्या पत्रकार परिषदेत समाज कार्यकर्त्या ॲड. प्रतिमा कुतिन्हाे, रामा काणकोणकर, संजय बर्डे, तारा केरकर व इतर अनेक समाज कार्यकर्ते उपस्थित होते
ॲड. प्रतिमा कुतिन्हो म्हणाल्या विरियातो यांचा पराभव करण्यासाठी भाजपने सर्व ताकद लावली होती पण लाेक पैसा तसेच सत्तेपुढे न वाकता समाज कार्यकर्त्यांला न्याय दिला आहे. विरियातो यांनी दक्षिण गाेव्यात विविध सामाजिक विषय हाताळले होते. त्यामुळे त्यांना याचे श्रेय मिळाले आहे. आता कॅप्टन समाजातील विविध समस्या विषय लाेकसभेत मांडणार आहे. या भाजप सरकारचा भ्रष्टाचार समोर आणणार आहे.
रामा काणकोणकर म्हणाले, पैसा आणि सत्तेपेक्षा मतदार श्रेष्ठ असतात हे दक्षिण गोव्यातील लाेकांनी दाखवून दिले आहे. सर्वजण एकत्र आल्याने समाज कार्यकर्त्यांचा विजय झाला आहे. काही लोक समाज कार्यकर्त्यांनी राजकारणात नसावे म्हणतात पण समाज कार्यकर्ता राजकारणात बदल घडवू शकतो. समाज कार्यकर्ता राजकारणाला वेगळी दिशा देऊ शकतो. जे विषय इतर राजकारणी साेडवू शकत नाही ते समाज कार्यकर्ता राजकारणात येऊन साेडवू शकतो. अनेक समाज कार्यकर्त्यांनी त्यांना दिलेल्या दिलेला पाठिंब्यामुळे कॅप्टन विरियातो यांचा विजय झाला आहे.