मुंबई-गोवा 'वंदे भारत' रेल्वेगाडी २६ पासून शक्य

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2023 08:26 AM2023-06-15T08:26:19+5:302023-06-15T08:27:00+5:30

या रेल्वेगाडीची प्रतीक्षा गोवेकर मोठ्या आतुरतेने करीत आहेत. 

mumbai goa vande bharat train possible from 26 june | मुंबई-गोवा 'वंदे भारत' रेल्वेगाडी २६ पासून शक्य

मुंबई-गोवा 'वंदे भारत' रेल्वेगाडी २६ पासून शक्य

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : मुंबई-गोवा 'वंदे भारत' रेल्वेगाडी येत्या २६ पासून सुरू केली जाण्याची शक्यता आहे. गोव्याहून सहा तासांत मुंबईला पोहोचवणाऱ्या या रेल्वेगाडीची प्रतीक्षा गोवेकर मोठ्या आतुरतेने करीत आहेत. 

३ जून रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी या रेल्वेगाडीचे व्हर्च्यूअल उद्घाटन करणार होते; परंतु आदल्याच दिवशी ओडिशात तीन रेल्वेगाड्यांचा मोठा अपघात घडल्याने उद्घाटन लांबणीवर टाकण्यात आले.

दरम्यान, गोवा-मुंबई मार्गाबरोबरच बंगळुरू-हुबळी, पाटणा-रांची, भोपाळ- इंदूर व भोपाळ- जबलपूर या रेल मार्गावरही एकाच दिवशी "वंदे भारत' रेलगाड्या सुरू केल्या जातील.
 

Web Title: mumbai goa vande bharat train possible from 26 june

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.