माजी मंत्र्यांसह त्याच्या कुटुंबियांच्या अटकेसाठी मुंबई पोलीस गोव्यात
By वासुदेव.पागी | Published: November 7, 2023 05:08 PM2023-11-07T17:08:27+5:302023-11-07T17:11:11+5:30
अटक चुकविण्यासाठी परुळेकर यांनी अटकपूर्व जामीनसाठी मुंबई दिवाणी न्यायालयात व घेतली होती.
पणजी: मालमत्तेच्या खरेदीच्या नावाने १४.९ कोटींची फसवणूक करण्याच्या पप्रकरणातरेईश - मागूश रिअल इस्टेट कंपनीचे संचालक व माजी मंत्री सुरेश परुळेकर यांना अटक करण्यासाठी मुंबई पोलीस गोव्यात दाखल झाले आहेत.
१४.९ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणात माजीमंत्री परुळेकर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाकडून गुन्हा नोंदविण्यात आला होता. परंतु अटक चुकविण्यासाठी परुळेकर यांनी अटकपूर्व जामीनसाठी मुंबई दिवाणी न्यायालयात व घेतली होती. मात्र त्यांना अटकपूर्व जामीन मंजूर झाला नसल्यामुळे त्यांना अटक करण्यासाठी मुंबईहून पोलीस पथक गोव्यात दाखल झाले आहे.
परुळेकर यांच्याविरुद्ध दाखल झालेल्या तक्रारीनुसार त्यांनी जमीन खरेदी करून देण्याचे सांगून पैसे घेतले व नंतर फसवणूक केली. मूंबई स्थित प्रेमचंद गावस या प्रकरणातील तक्रारदार आहेत. तेमूळचे डिचोली येथील आहेत. गावस यांनी जानेवारी २००८ ते फेब्रुवारी २०२३ या काळात परूळेकर यांना नियमित हप्त्यांमध्ये १४.९ कोटी रुपये दिले होते. ठरविक कालावधीत गावस यांना जमीन मिळवून देणे हे परुळेकर यांच्या कंपनीची जबाबदारी होती. परंतु त्यांनी जमीन उपलब्ध करून दिली नाही. त्यामुळे आपली फसवणूक केल्याचे तक्रारदाराच्या लक्षात आले.
परुळेकर यांच्यासह त्यांची पत्नी व मुलगा असेतिघेही या कंपनीचे संचालक आहेत. त्यामुळे तिघेही कायद्याच्या कात्रीत सापडले असून तिघांनाही मुंबई पोलीस अटक करून घेऊन जाऊ शकतात.