दुपदरीकरण होताच मुंबई - गोवा ५ तासांत: मुख्यमंत्री 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2023 09:44 AM2023-06-28T09:44:13+5:302023-06-28T09:44:42+5:30

पंतप्रधानांच्या हस्ते 'वंदे भारत' चे लोकार्पण

mumbai to goa in 5 hours as soon as double track happens claims chief minister pramod sawant | दुपदरीकरण होताच मुंबई - गोवा ५ तासांत: मुख्यमंत्री 

दुपदरीकरण होताच मुंबई - गोवा ५ तासांत: मुख्यमंत्री 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : गोव्याच्या विकासाची घोडदौड सुपरफास्ट पद्धतीने सुरू आहे. 'वंदे भारत' रेल्वेमुळे यात आणखी भर पडणार आहे. त्याच पार्श्वभूमीवर दुपदरीकरणाचे काम सुरू आहे. हे काम झाल्यानंतर गोव्यातून अवघ्या पाच तासांत मुंबईत पोहोचता येणार आहे, अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते काल भोपाळ येथून मुंबई-गोवा यासह पाच 'वंदे भारत' रेल्वे गाड्यांना हिरवा बावटा दाखवून त्यांचे लोकार्पण केले. यावेळी मडगाव रेल्वेस्थानकावर आयोजित सोहळ्यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. त्यांच्यासोबत राज्यपाल पी. एस. श्रीधर पिल्लई, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, राज्यसभा खासदार विनय तेंडुलकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, महाराष्ट्राचे अन्न व नागरी पुरवठामंत्री रवींद्र चव्हाण, आमदार दिगंबर कामत, उल्हास तुयेंकर, कोकण रेल्वे महामंडळाचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक संजय गुप्ता व इतर मान्यवर उपस्थित होते.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकारने देशात दळणवळणाच्या क्षेत्रात भरीव क्रांती केली आहे. आपला गोवाही केंद्र सरकारच्या साहाय्याने विकासाची घोडदौड करत आहे. सरकारने पत्रादेवी ते पोळेपर्यंत सहापदरी मार्ग तसेच आवश्यक ठिकाणी उड्डाणपूल उभारून लोकांना सुरळीत वाहतूक सेवा दिली आहे. मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू करून २० राज्यांना थेट जोडलो गेलो आहोत. यापुढे विमानसेवेत आणखी राज्यांना जोडले जाणार आहे.

"वंदे भारत' ही सुपरफास्ट एक्स्प्रेस खास करून पर्यटक व व्यावसायिकांच्या सेवेसाठी सुरू केली आहे. या रेल्वेच्या जलदगतीने लोकांचा किमती वेळ वाचणार हेच वंदे भारत रेल्वे गाडी सुरू करण्याचे मुख्य उद्दिष्ट असल्याचे डॉ. सावंत म्हणाले. गोव्याचा मुंबईतील लोकांकडे आधीपासून सलोख्याचा संबंध आहे या दोन्ही राज्यांतील लोक पर्यटनाबरोबर व्यवसाय व वैद्यकीय सेवेसाठी रेल्वेने ये-जा करतात. ही रेल्वे गाडी त्यांनी जास्तच सोयीस्कर ठरणार आहे, असे सावंत म्हणाले.

मडगाव रेल्वेस्थानक फाईव्ह स्टार बनविणार

मडगावचे रेल्वेस्थानक उच्च दर्जाचे आहे. सर्वोत्कृष्ट रेल्वेस्थानकाचा पुरस्कारही मडगावच्या रेल्वेस्थानकाला मिळालेला आहे. रेल्वेस्थानकावरून दिल्लीपासून कन्याकुमारी ते पाटणा, बिहार, छत्तीसगडपर्यंत रेल्वे सेवेची कनेक्टिव्हिटी जोडलेली आहे. यापुढे सरकारच्या सहकार्यान मडगावचे रेल्वेस्थानक फाईव्ह स्टार बनविणार, असे आश्वासन डॉ. सावंत यांनी दिले. या रेल्वेस्थानक परिसरात टॅक्सी, रिक्षा, बससेवा, दुचाकी पायलट सेवा, पर्यटन टॅक्सी सेवा उपलब्ध आहेत.

गोव्यातून चंदे भारत रेल्वे सुरू होणे हा किनारपट्टीच्या राज्याला इतर राज्यांशी जोडण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा आहे. या नव्या सेवेमुळे राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या संख्येत मोठी वाढ होणार आहे. किनारपट्टी लाभलेली राज्ये इतर राज्यांशी जोडण्याचा केंद्राचा मनोदय आहे. - रोहन खंवटे, पर्यटनमंत्री

नव्या रेल्वे

- भोपाळ ते इंदोर (राणी कमलापती) 
- भोपाळ ते जबलपूर (राणी कमलापती)
- रांची ते पटना (बिहार) 
- धारवाड ते बंगळुरू (कर्नाटक)
- गोवा ते मुंबई (मडगाव)

४०० 'वंदे भारत' देशभरात धावणार

यापुढे टप्प्या-टप्प्यानी विविध राज्यांत ही वंदे भारत एक्स्प्रेस सुरू करण्यात येणार आहे. संपूर्ण वातानुकूलित असलेली घंटे भारत ही १८ डब्यांची विजेवर धावणारी रेल्वे आहे. यात प्रवाशांसाठी चांगल्या सुविधा आहेत. आगामी न वर्षात देशभर ४०० वंदे भारत एक्स्प्रेस धावताना दिसतील. लवकरच सर्वसामान्य प्रवाशांसाठी भारत एक्स्प्रेसला स्लीपर कोच जोडण्यात येणार असल्याचे केंद्रीय राज्यमंत्री श्रीपाद नाईक म्हणाले

 

Web Title: mumbai to goa in 5 hours as soon as double track happens claims chief minister pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.