पुतळाप्रश्नी सभापतीच निर्णय घेणार, भाजप लोबोंवर नाराज, मगोपची आज बैठक

By ऑनलाइन लोकमत | Published: February 5, 2018 09:05 PM2018-02-05T21:05:48+5:302018-02-05T21:06:10+5:30

विधानसभेसमोर स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करावा की नाही तसेच पुतळ्य़ाविषयीचा ठराव विधासभेत चर्चेसाठी घ्यावा की नाही याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी सभापती घेणार आहेत. विधानसभेची जागा ही सभापतींच्या अखत्यारित येत असल्याने पुतळ्य़ाविषयी तेच काय ते ठरवतील, अशी भूमिका भाजपनेही घेतली आहे.

Murder will be decided by Speaker, BJP angry at Lobes, Today's meeting today | पुतळाप्रश्नी सभापतीच निर्णय घेणार, भाजप लोबोंवर नाराज, मगोपची आज बैठक

पुतळाप्रश्नी सभापतीच निर्णय घेणार, भाजप लोबोंवर नाराज, मगोपची आज बैठक

Next

पणजी - विधानसभेसमोर स्वर्गीय जॅक सिक्वेरा यांचा पुतळा उभा करावा की नाही तसेच पुतळ्य़ाविषयीचा ठराव विधासभेत चर्चेसाठी घ्यावा की नाही याबाबतचा निर्णय हा सर्वस्वी सभापती घेणार आहेत. विधानसभेची जागा ही सभापतींच्या अखत्यारित येत असल्याने पुतळ्य़ाविषयी तेच काय ते ठरवतील, अशी भूमिका भाजपनेही घेतली आहे. भाजपचे आमदार मायकल लोबो यांनी पक्ष भूमिका विचारात न घेता ठरावाची नोटीस दिलेली असल्याने पक्ष त्यांच्यावर नाराज झाला असल्याची माहिती मिळाली. दुस:याबाजूने आपली रणनीती ठरविण्यासाठी मगोपने आज मंगळवारी पक्षाचे आमदार, यापूर्वीचे सगळे उमेदवार व केंद्रीय समिती यांची संयुक्त बैठक बोलावली आहे.

जनमत कौल चळवळीतील सिक्वेरा यांचे योगदान लक्षात घेऊन त्यांचा पुतळा उभारावा अशी मागणी करणा:या ठरावाची नोटीस आमदार मायकल लोबो यांनी दिली आहे. तत्पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार चर्चिल आलेमाव यांनीही नोटीस दिली आहे. काँग्रेसची नोटीस अजून सादर झालेली नाही. तथापि, काँग्रेसच्या सर्व सोळा आमदारांनी मिळून नोटीस द्यायचे ठरवले आहे. सध्या सभापतींसमोर दोन नोटीसा आहेत. कितीही नोटीसा आल्या तरी, शेवटी त्या कामकाजात दाखल करून घ्यायच्या की नाही हे सभापती ठरवतील. तसेच विधानसभेसमोर पुतळा उभा करायचा की नाही हे ठरविण्याचा अधिकारही सभापतींचा असल्याने सभापतीच काय ते ठरवतील, असे भाजपच्या काही राज्यस्तरीय पदाधिका:यांनी लोकमतला सांगितले. विधानसभेसमोर पुतळा कुणाचाच नको, असे भाजपने आपल्या ठरावाद्वारे यापूर्वी ठरवले आहे. तरीही शेवटी विधानसभा प्रकल्पाची जागा ही सभापतींच्या अधिकार क्षेत्रत येत असल्याने सभापती काय ते ठरवतील. शिवाय विधानसभेत भाजपची रणनीती कशी असावी ते भाजप विधिमंडळ पक्ष व त्या पक्षाचे नेते मुख्यमंत्री र्पीकर ठरवतील, असे भाजपच्या कोअर टीमच्या एका सदस्याने सांगितले. या आठवडय़ात कोअर टीमची बैठक होणार आहे. त्यावेळी लोबो यांची भूमिकाही चर्चेस येणार आहे. लोबो यांनी विधानसभेसमोर सिक्वेरा यांचा पुतळा उभा करायला हवा अशी भूमिका घेऊन त्याविषयीच्या ठरावाची नोटीस विधिमंडळ खात्याला सादर केली आहे. भाजपच्या सर्व आमदारांची बैठक येत्या शुक्रवारी होणार आहे.

काही वर्षापूर्वी स्व. भाऊसाहेब बांदोडकर यांचा पुतळा विधानसभेसमोर उभा करण्याचा ठराव झाला होता, तेव्हाच आणखी कुठलाच पुतळा विधानसभेच्या कक्षेत उभा करायचा नाही असे त्या ठरावाद्वारे ठरले होते. मगो पक्षाने सध्या तोच धागा पकडला आहे व पूर्वीच्या ठरावानुसारच सर्वाची भूमिका असावी अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. मगोपचे नेते असलेले मंत्री सुदिन ढवळीकर, मंत्री बाबू आजगावकर व आमदार दिपक प्रभू पाऊसकर यांच्या सहभागाने मगोपच्या केंद्रीय समितीची बैठक आज सायंकाळी पाच वाजता पणजीतील पक्ष कार्यालयात होणार आहे. जर विधानसभेत ठराव आला तर, सिक्वेरा यांच्या पुतळ्य़ाविषयी आपण कोणती भूमिका घ्यावी ते मगोप या बैठकीत ठरविल. शिवाय मगोपचा स्थापना दिवस कोणकोणत्या कार्यक्रमांद्वारे साजरा करावा तेही बैठकीत ठरणार आहे. 2क्17 च्या विधानसभा निवडणुकीत पक्षाने उभे केलेले सगळे उमेदवार बैठकीस उपस्थित असतील. 

पुतळाप्रश्नी किंवा ठरावांच्या नोटीशीविषयी आपण अजून कोणताच निर्णय घेतलेला नाही. आपण यापूर्वीही आपली भूमिका कुठेच जाहीर केलेली नाही. तथापि, विधानसभा प्रकल्प हा सभापतींच्या अधिकार क्षेत्रत येत असल्याने आपण योग्य ती भूमिका योग्यवेळी घेईन.

- सभापती डॉ. प्रमोद सावंत

 

पुतळ्य़ाबाबत सध्या विधानसभेबाहेर अनेकजण विविध विधाने करत आहेत. ते सगळे राजकारण आहे. सरकार अधिकारावर येऊन एक वर्ष झाले. आता लोकांना कामे झालेली हवी आहेत. नसते भावनिक वाद नको. काहीजण पुतळ्य़ांच्या विषयावरून उगाच नाटके करत आहेत. स्व. भाऊसाहेब बांदोडकरांचा पुतळा विधानसभेसमोर उभारताना आणखी मात्र कुणाचाच पुतळा नको, असा ठराव यापूर्वी विधानसभेत झालेला आहे. त्या ठरावाला विसरून जाऊन किंवा त्या भूमिकेला बगल देऊन त्या ठरावाच्या विरुद्ध अशी भूमिका आता नव्या ठराव्दारे घेता येते का? तसे झाल्यास तो चुकीचा पायंडा ठरेल.

- दीपक ढवळीकर, मगोपचे अध्यक्ष

Web Title: Murder will be decided by Speaker, BJP angry at Lobes, Today's meeting today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.