नादिया मृत्यू प्रकरणाची फाईल बंद
By admin | Published: February 21, 2015 02:16 AM2015-02-21T02:16:56+5:302015-02-21T02:19:40+5:30
मडगाव : चार वर्षांपूर्वी गोव्यातील संपूर्ण राजकीय परिस्थितीत उलथापालथ घडवून आणलेल्या नादिया तोरादो मृत्यू प्रकरणातील मुख्य
मडगाव : चार वर्षांपूर्वी गोव्यातील संपूर्ण राजकीय परिस्थितीत उलथापालथ घडवून आणलेल्या नादिया तोरादो मृत्यू प्रकरणातील मुख्य आरोपी व विद्यमान ग्रामीण विकासमंत्री मिकी पाशेको यांच्याविरुद्ध कुठलाही सबळ पुरावा न सापडल्याने हे प्रकरण तात्पुरते बंद करण्यासाठी क्राईम ब्रँचने मडगावच्या न्यायालयात ए फायनल अहवाल दाखल केला आहे.
शुक्रवारी क्राईम ब्रँचने याविषयी अर्ज दाखल केला. या वृत्ताला क्राईम ब्रँचचे अधीक्षक कार्तिक कश्यप यांनी दुजोरा दिला. या प्रकरणात पाशेको यांच्याबरोबरच त्यांचे तत्कालीन विशेषाधिकारी लिंडन मोंतेरो, मृत नादियाची आई सोनिया तोरादो व अन्य दोन भावांवर क्राईम ब्रँचने गुन्हा नोंद केला होता. (प्रतिनिधी)