नारायण राणे यांनी घेतली गोव्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट
By किशोर कुबल | Published: May 8, 2024 09:14 PM2024-05-08T21:14:37+5:302024-05-08T21:15:52+5:30
‘ही केवळ सदिच्छा भेट होती. गोव्यात आणि माझ्या भागात निवडणुका संपलेल्या आहेत. विमानतळावर जाताना सवड होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटूनच पुढे जावे असा विचार केला व आलो. काही विशेष प्रयोजन नव्हते.’
पणजी : लोकसभेसाठी महाराष्ट्रात ४८ पैकी ४० ते ४५ जागांवर तसेच गोव्यातील दोन्ही जागांवर भाजप उमेदवार विजयी होतील, असा दावा केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केला. राणे यांनी गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची आज आल्तिनो येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेऊन चर्चा केली. या भेटीनंतर बोलताना राणे म्हणाले कि, ‘ही केवळ सदिच्छा भेट होती. गोव्यात आणि माझ्या भागात निवडणुका संपलेल्या आहेत. विमानतळावर जाताना सवड होती त्यामुळे मुख्यमंत्र्यांना भेटूनच पुढे जावे असा विचार केला व आलो. काही विशेष प्रयोजन नव्हते.’
राणे हे सिंधुदुर्ग-रत्नागिरी लोकसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटार रिंगणात आहेत. तेथेही मंगळवारी निवडणूक झाली. दरम्यान, सिंधुदुर्गातून गोव्यात येणाय्रा वाळूच्या विषयावर वाद आहे. यावर मुख्यमंत्र्यांकडे चर्चा केली का, असे विचारले असता राणे यानी अशी कोणतीही चर्चा झाली नसल्याचे सांगितले.