नेपाळ हिंदू राष्ट्र होण्यासाठी नरेंद्र मोदींनी पुढाकार घ्यावा
By admin | Published: June 26, 2016 03:29 AM2016-06-26T03:29:22+5:302016-06-26T03:29:22+5:30
नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा व त्यासाठी नेपाळमध्ये सुरू असलेल्या चळवळीला समर्थन द्यावे, अशी मागणी नेपाळच्या राष्ट्रीय
पणजी : नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र म्हणून घोषित करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुढाकार घ्यावा व त्यासाठी नेपाळमध्ये सुरू असलेल्या चळवळीला समर्थन द्यावे, अशी मागणी नेपाळच्या राष्ट्रीय धर्मसभेचे अध्यक्ष माधव भट्टाराई यांनी केली. तसा ठरावही रामनाथी येथे झालेल्या ५व्या अखिल भारतीय अधिवेशनात मंजूर करण्यात आला.
अधिवेशनाला आलेले भट्टराई पत्रकार परिषदेत बोलताना म्हणाले की, नेपाळ हे ९४ टक्क्यांहून अधिक हिंदू नागरिक असलेले हिंदू राष्ट्रच आहे. देशात आलेल्या साम्यवादी सरकारने ते निधर्मी राष्ट्र घोषित जरी केले असले तरी नेपाळची संस्कृती ही हिंदू संस्कृती आहे. नेपाळ पुनश्च हिंदू राष्ट्र बनविण्यासाठी सुरू असलेल्या नेपाळी लोकांच्या आंदोलनाला भारताने समर्थन दिल्यास नेपाळी लोकांचा मार्ग सोपा होईल.
नेपाळमध्ये मधेंसीच्या चळवळीला लोकांचा पाठिंबा नाही; परंतु केवळ भारताने या चळवळीला पाठिंबा दिल्यामुळे या चळवळीचा प्रभाव जाणवत आहे. उलट नेपाळ हे पुन्हा हिंदू राष्ट्र घोषित करण्यासाठीच्या आंदोलनाला जोर चढला आहे आणि मोठ्या प्रमाणावर लोकांचा पाठिंबाही आहे. लोकाश्रय नसलेल्या चळवळीला पाठिंबा देण्यापेक्षा लोकाश्रय असलेल्या चळवळीला भारताने समर्थन द्यावे आणि नेपाळ हिंदू राष्ट्र बनण्यासाठी पुढाकार घ्यावा, असे ते म्हणाले.
हिंदू जनजागृती समितीचे
प्रवक्ते रमेश शिंदे, तेलंगण येथील भाजपाचे आमदार टी. राजसिंह, वाराणसी येथील हिंद विद्या केंद्राचे संचालक रामेश्वर मिश्र आणि
हिंद विधिज्ञ परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष वीरेंद्र इचलकरंजीकर उपस्थित
होते. (प्रतिनिधी)
गोव्यात गोवंश हत्या बंदी हवी : गोव्यात गोवंश हत्या बंदी होणे आवश्यक असल्याचे तेलंगणचे भाजपा आमदार
टी. राजासिंह यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.