अभाविपचे राष्ट्रीय अधिवेशन ७ डिसेंबर रोजी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 4, 2023 05:38 PM2023-11-04T17:38:30+5:302023-11-04T17:39:28+5:30
६९ वे राष्ट्रीय अधिवेशन हा चार दिवसांचा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा आहे.
नारायण गावस
पणजी: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अभाविप) गोवाने अभावीपच्या 'अमृत मोहोत्सव वर्ष' अंतर्गत ७ ते १० डिसेंबर २०२३ या कालावधीत दिल्ली येथे होणाऱ्या ६९ व्या राष्ट्रीय अधिवेशनचे पोस्टर लाँच केले. अभाविप गोवा राज्य संयोजक धनश्री मांद्रेकर, उत्तर गोवा संयोजक सुदीप नाईक आणि राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्य अवधूत कोटकर, यांच्या उपस्थितीत पणजी येथील अभाविप गोवा कार्यालयात पोस्टर लाँच करण्यात आले.
६९ वे राष्ट्रीय अधिवेशन हा चार दिवसांचा कार्यक्रम आहे ज्याचा उद्देश देशाच्या कानाकोपऱ्यातील विद्यार्थ्यांना एकत्र आणण्याचा आहे. अभाविप, आपल्या संघटनात्मक प्रवासाची ७५ वर्षे पूर्ण करत असून, तरुणांना त्यांच्या संघटनात्मक प्रवासातील महत्त्वपूर्ण टप्पे आणि विद्यार्थी चळवळींमध्ये अभाविप ची भूमिका जाणून घेण्याचा उद्देश आहे. देशभरातील तरुण यात सहभागी होणार आहेत, असे धनश्री मांद्रेकर म्हणाल्या.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद विद्यार्थ्यांना आपल्या राष्ट्राच्या इतिहासाशी आणि मुळांशी जोडून त्यांना आधुनिकतेची ओळख करून देण्याचा प्रयत्न करते आणि त्यांना 'राष्ट्र' म्हणून भारताचा अखंड प्रवास समजून घेण्यास सक्षम करते. यासाठी अभाविपने या परिषदेचा एक भाग म्हणून विविध उपक्रम राबविले आहेत. या अधिवशात अभाविप राष्ट्रीय अध्यक्ष मार्गदर्शन करणार आहे. देशभरातिल ४४ प्रांतातील निवडक विद्यार्थी सहभागी हाेणार आहे, असेही मांद्रेकर म्हणाल्या.