राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रोइंग क्रिडा प्रकार व्हावा यासाठी सरकारच्या मदतीला शेतकरी पुढे सरसावले

By समीर नाईक | Published: October 27, 2023 04:14 PM2023-10-27T16:14:28+5:302023-10-27T16:14:52+5:30

ओहटी भरतीचा परिणाम नदीच्या पाण्यावर होत नाही, त्यामुळे तेथे जमवून घेता येते.

National sports competition: Farmers came forward with the help of the government to make rowing a sport | राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रोइंग क्रिडा प्रकार व्हावा यासाठी सरकारच्या मदतीला शेतकरी पुढे सरसावले

राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा : रोइंग क्रिडा प्रकार व्हावा यासाठी सरकारच्या मदतीला शेतकरी पुढे सरसावले

पणजी : विजेत्याच्या शोधासाठी गावातच जावे लागते, अशी जुनी म्हण आहे. गोव्यात आयोजित ३७ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेबाबत रोइंग स्पर्धेसाठी राज्याच्या राजधानीपासून २० किलोमीटर अंतरावरील शापोरा नदीकडे धाव घ्यावी लागली. गोव्यात अनेक ठिकाणी जलसाठे असले तरी, या किनारी राज्यात अद्याप रोइंगने मूळ धरलेले नाही आणि त्यामुळे पायाभूत सुविधा तयार करण्यात आल्या नाहीत.

आयोजकांना याची पूर्ण कल्पना होती की रोइंग स्पर्धेसाठी जागा निवडणे आव्हानात्मक आहे, कारण यासाठी स्थिर पाण्याची गरज असते आणि अंतरही दोन किंवा अधिक किलोमीटर असावे लागते. या सर्व आवश्यक बाबी एकाच ठिकाणी कुठे असतील याचा शोध घेण्यात बराच वेळ गेला आणि अखेर त्यांना योग्य जागा सापडली खरी पण तेथे पायाभूत सुविधा उभारणे ही समस्या निर्माण झाली, कारण नदीभोवती मोकळी जागा उपलब्ध नव्हती. अशा वेळी स्थानिक शेतकरी आयोजकांना मदत करण्यासाठी पुढे सरसावले आणि मळणीचा हंगाम असूनही शेतकऱ्यांनी जागा उपलब्ध करून दिली.

निवडलेले ठिकाण योग्यच आहे. ओहटी भरतीचा परिणाम नदीच्या पाण्यावर होत नाही, त्यामुळे तेथे जमवून घेता येते. खरी समस्या होती ती म्हणजे नौका कुठे ठेवायच्या आणि तांत्रिक सुविधांसाठी कुठली जागा घ्यायची. ही अडचण निर्माण झाली कारण भोवतालच्या जागेत खाजगी शेती होती, असे स्पर्धेचे संचालक ईस्मायल बेग यांनी सांगितले. 

१२ दिवसांपूर्वी आपण आलो त्यावेळी नदीच्या दुसऱ्या किनाऱ्यावर सर्वत्र हरित जागा आणि नारळाची झाडे डुलताना दिलत होती, असे वर्णन त्यांनी केले. केवळ १२ दिवसांत सर्व तयारी पूर्ण करायची असल्याने पीक घेत असलेल्या शेतकऱ्यांकडून जागा मिळवण्यासाठी त्यांचे सहकार्य आवश्यक होते, कारण त्यावेळी कापणी व मळणी झालेली नव्हती. मात्र त्याच दोन दिवसांत २३ शेतकऱ्यांनी आपली ३० हजार चौरस मीटर जागा आयोजकांच्या स्वाधीन केल्याने आणि सुमारे ५ हजार चौरस मीटरवरील झाडाझुडपे साफ करून रस्ता करण्यासाठी जागा उपलब्ध करून दिली. 

प्रत्येक नवा स्थळावर नवे आव्हान उभे राहते. पण गेल्या दहा दिवसांत ही जागा सपाट करून, तात्पुरती पायाभूत सुविधा उभारताना शेतजमिनीची कोणतीही हानी होणार नाही आणि भविष्यात पीक घेताना कोणताही अडचण येणार नाही, याची खबरदारी आम्ही घेतली आहे, असे बेग म्हणाले. 

काही शेतकऱ्यांनी मागणी केली नसली तरी सरकारने सर्व शेतकऱ्याना नुकसान भरपाई देण्याचे ठरविले आहे. गोव्याचे क्रीडा मंत्री गोविंद गावडे यांनी शेतकऱ्यांची प्रशंसा केली आहे. शेतकऱ्यांकडून उत्स्फूर्त पाठिंबा मिळाल्यामुळे हे खेळ गोमंतकीयांसाठी किती महत्त्वाचे आहेत, याचा प्रत्यय येतो असे क्रीडा मंत्री गोविंद गावडे म्हणाले. त्यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे आभारी आहोत, असे ते पुढे म्हणाले.

Web Title: National sports competition: Farmers came forward with the help of the government to make rowing a sport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा