खाण धोरणाच्या छाननीची गरज
By admin | Published: September 7, 2014 01:09 AM2014-09-07T01:09:39+5:302014-09-07T01:09:39+5:30
मडगाव : राज्यातील खाण धोरणाची लोकांपुढे छाननी होणे गरजेचे आहे. तसेच ३0 दिवसांपर्यंत ते जनतेसाठी खुले ठेवा,
मडगाव : राज्यातील खाण धोरणाची लोकांपुढे छाननी होणे गरजेचे आहे. तसेच ३0 दिवसांपर्यंत ते जनतेसाठी खुले ठेवा, अशी मागणी कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनी केली आहे. मडगावात
आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
खाणींचा लिलाव केला असता तर किमान २७ हजार ते ३५ हजार कोटींचा नफा झाला असता. मात्र, ते न करता केवळ ३८0 कोटींची स्टॅम्पड्युटी भरून या खाणी पूर्वीच्या खाण व्यवसायांना देण्याचा घाट रचला जात आहे, असा आरोपही त्यांनी केला. या खनिज व्यावसायिकांना देण्याचे आश्वासन देण्यापूर्वी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी जनतेशी चर्चा केली आहे का, असा प्रश्न त्यांनी या वेळी उपस्थित केला.
सर्वोच्च न्यायालयाने ‘नीट’ प्रकरणात मारलेला शेरा गोव्यासाठी बाधक ठरू नये, असा सल्लाही लॉरेन्स यांनी या वेळी दिला. पंतप्रधान नरेंद्र मोदी निर्यात होणाऱ्या खनिजाचे लिलाव करण्याची भाषा बोलतात, त्याच वेळी पर्रीकर मात्र नेमकी उलटी भाषा करीत असल्याने गोव्याला नुकसान सोसावे लागेल, असा दावाही त्यांनी केला. (प्रतिनिधी)