गोव्यातही तृतीयपंथीयांच्या वाटयाला कुचंबणा

By admin | Published: September 9, 2016 08:23 PM2016-09-09T20:23:50+5:302016-09-09T20:23:50+5:30

देशात पाच हजार मुलांमागे एक मुल हे तृतीयपंथीय म्हणून जन्मास येते. राज्यातील वास्को, कळंगुट या भागात तृतीयपंथीयांची वस्ती आहे.

Neglect in the views of third parties in Goa | गोव्यातही तृतीयपंथीयांच्या वाटयाला कुचंबणा

गोव्यातही तृतीयपंथीयांच्या वाटयाला कुचंबणा

Next

ऑनलाइन लोकमत 

पणजी, दि. ९ - देशात पाच हजार मुलांमागे एक मुल हे तृतीयपंथीय म्हणून जन्मास येते. राज्यातील वास्को, कळंगुट या भागात तृतीयपंथीयांची वस्ती आहे. यातील काही मुळ गोमंतकीय आहेत तर काही बिगरगोमंतकीय आहेत. मात्र गेल्या 20 ते 25 वर्षापेक्षा जास्त काळ गोव्यातच वास्तव्यास आहेत. समाजाचाच एक भाग असलेल्या तृतीयपंथीयांना मोकळेपणाने जगताना कुचंबणा सहन करावी लागते तसेच समाजाकडून त्यांची अहवेलनाही होते. जीवंतपणीच नव्हे तर मेल्यानंतर देखील तृतीयपंथीयांच्या वाटय़ाला यातनाच येतात असे अनुभव ऐकायला मिळाला. 
राज्यात काही आठवडय़ापूर्वी राज्य एडस नियंत्रण संस्थेकडून आयोजित केलेल्या परिषदेत गोव्यातील आणि गोव्याबाहेरील तृतीयपंथीयांनी सहभाग घेतला होता. यात गोव्यातील 20 ते 25 तृतीयपंथीय एकत्रित आले होते. स्त्री आणि पुरुष या दोन समाजमान्य लिंगा व्यतिरिक्त इतर म्हणजे तृतीयपंथीय समाजाचा भाग असलेल्यांची स्थिती ‘आई काम करु देत नाही बाप भीक मागू देत नाही’ अशीच असेत. समाजाचे रक्षक म्हणून ज्या पोलिस खात्याकडे आदराने पाहिले जाते या पोलिस खात्याबाबत तर तृतीयपंथीयांच्या मनात राग, द्वेष भरलेला दिसत आहे. ‘चोर आणि सेक्स वर्कर‘ ही दोन वैशिष्टय़े तृतीयपंथीयांच्या नावावर आहे. राजी खुशीने कुणीही असे काम करण्यास तयार होणार नाही, मात्र पोटाची भुक थांबविण्यासाठी आम्हाला हीच कामे करावी लागतात, असे परिषदेत आलेल्या एका तृतीयपंथीयाने सांगितले.
राज्यात अन्न सुरक्षा योजनेचा लाभ घेण्यासाठी आलेल्या अर्जात साधारण 80 तृतीयपंथीयांची नोंद आहे. मात्र काही वर्षापूर्वी झालेल्या सर्वेक्षणात राज्यात 40च्या आसपास तृतीयपंथीय आहेत असे नोंदणी झाली होती. समाजाच्या भितीने आणि वागणूकीमुळे तृतीयपंथीय आपली ओळख देत नाहीत. 
शर्मिला (नाव बदलले आहे) राज्यात लहान वयोगटात होणा:या आत्महत्येंची प्रकार वाढतात. आत्महत्येनंतर कुटुंबिय पोलिसांना वेगवेगळी कारणो देतात. मात्र आपल्यातील बदल हे वेगळ्या समाजातील लोकांचे आहेत याची जाणीव झाल्यानंतर, त्याची वाच्यता केल्यास घराण्याची लाज जाईल या भितीने काही मुले आत्महत्येचा मार्ग स्विकारतात. यातील काही मुले कुटुंबातील सदस्यांकडे मन मोकळे करतात तर काही स्वत:शीच भांडून हरल्यानंतर थेट आत्महत्येचा निर्णय घेतात. 
तर मग आम्हीच उपेक्षित का
आपल्या कुटुंबात मतिमंद, व्यंग असलेले अपत्य जन्माला येते. डावखुरी मुलं जन्माला येतात. या मुलांना आपण वेगळी मानतो का असा प्रश्न तृतीयपंथीय करतात. आम्च्या शरीरात होणारे बदल हे नैसर्गिक आहेत. ते कुणीही ओढवून घेत नाही. पण तरीही आम्ही उपेक्षित का असा प्रश्नही त्या करतात. समाजाने आमची मानसिकता समजून घेण्याचा प्रयत्न करायला हवा. आणि समाजापूर्वी कुटुंबाने आम्हाला भक्कम आधार देण्याचे धाडस दाखवायला हवे. आम्ही उपेक्षित आहोत म्हणून काही अशी आम्ही उपद्रवीही आहोत.प्रकृतीतील विकृतीही प्रकृतीचाच भाग असतो’ असेही त्या म्हणतात.
तक्रारीची नोंद ‘कोण‘ म्हणून करावी
दिवस किंवा रात्री रस्त्यावरुन चालताना आमची मस्करी केली जाते, सतावणूक, छेडछाड केली जाते. याबाबत पोलिसांत तक्रार करायला गेल्यास पोलिसांकडूनही उपेक्षित वागणूक मिळते. पोलिस भर चौकीत अपमान करतात. तक्रार नोंदवून घेण्यास विनवणी केली असता ‘कोण’ म्हणून तुमची तक्रार घ्यावी. स्त्री की पुरुष अशी विचारणा पोलिसांकडून केली जाते. अशा परिस्थितीत आम्ही समाजात स्वतंत्रपणो कसे जगू शकतो असा प्रश्नही या तृतीयपंथीयांच्या समोर आहे. 
स्मशानभूमी नाही, कुठे फेकायची प्रेत
मी गेल्या 20 वर्षापासून वास्कोला राहते. माझी गुरु गेल्या 40 ते 45 वर्षापासून गोव्यात वास्तव्यास आहे. हल्लीच काही महिन्यांपूर्वी गुरुच निधन झालं. तिच्या अंत्यविधीसाठी जागा नाही. समाजाचा भाग असूनही आमच्या वाटेला जिवंतपणी भोग असतातच पण मेल्यानंतरही आमच्या शरीराला विटंबणोलाच सामोरे जावे लागते. आमच्यासाठी स्मशानभूमीत जागा नाही. तर मग मेल्यानंतर आमची प्रेते कुठं फेकावी अशा शब्दात एका तृतीयपंथीयाने कैफियत मांडली. 
आमच्यासाठीही वृद्धाश्रम हवे
तृतीयपंथीय म्हणून ओळख झाल्यानंतर काहींच्या नशिबी शिक्षण असूनही भिक मागणं, चोरी करणो किंवा सेक्स वर्कर म्हणून काम करुन आम्ही उदरनिर्वाह करतो. दर दिवसाच्या कमाईत अनेक वाटे असतात. तरुणवयात कसेबसे आम्ही पोटापुरते कमावतो पण वृद्धपकाळात कोणाचाही आधार नाही. अशावेळी तृतीयपंथीयांनी कसे दिवस काढावे. तृतीयपंथीयांसाठी वृद्धाश्रम हवा अशी मागणी त्यांनी केली. 
आरोग्याची अहवेलना
आजारी पडल्यास सरकारी इस्पितळात तात्पुरता उपचार करुन सोडतात. जास्त आजार असून अॅडमिट करण्याची वेळ आल्यास कुठल्या वॉर्डमध्ये अॅडमिट करावे असा प्रश्न डॉक्टर आणि इस्पितळाच्या कर्मचा:यांना पडतो. यामुळे गंभीर आजार जडलेल्या अनेक तृतीयपंथीयांना उपाचारांअभावी रहावे लागते. खासगी डॉक्टर आम्हाला तपासण्यास घेत नाही. आमच्या आरोग्याच्या समस्या पाहता प्रत्येक सरकारी इस्पितळात आमच्यासाठी राखीव वार्ड ठेवावा असे डायना हिने सांगितले. 
योजना आहेत पण कागदपत्रे नाहीत
सरकारच्या काही खात्यांतर्फे तृतीयपंथीयांसाठी विविध योजनांची अंमलबजावणी केली आहे. मात्र योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे नसल्याने तृतीयपंथीय कोणत्याही योजनांपासून वंचित राहतात. तृतीयपंथीयांचे जीवन म्हणजे अहवेलना आणि सौंदर्याचा एकत्रित प्रवास असून सरकार, समाज आणि सामाजिक संस्थांनी एकत्रित येउन आमच्या समस्या सोडविण्यास प्राधान्य देण्याची आवश्यकता आहे. शिक्षण, आरोग्य, अर्थाजन आणि आत्मसन्मानाने जगण्यासाठी त्यांनाही मोकळे आकाश देण्याची गरज आहे.

Web Title: Neglect in the views of third parties in Goa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.