टाटाच्या सहकार्यातून पीईएस महाविद्यालयात नवीन अभ्यासक्रम सुरू होणार: कृषी मंत्री रवी नाईक
By आप्पा बुवा | Published: April 7, 2023 05:54 PM2023-04-07T17:54:38+5:302023-04-07T17:54:45+5:30
पीईएस महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरत असून आगामी काळात येथे कायदा अभ्यासक्रमासह व्यावसायिक डिप्लोमा व अन्य शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली आहे.
फोंडा
पीईएस महाविद्यालय हे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना वरदान ठरत असून आगामी काळात येथे कायदा अभ्यासक्रमासह व्यावसायिक डिप्लोमा व अन्य शाखा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष व कृषिमंत्री रवी नाईक यांनी दिली आहे.
त्यानी दिलेल्या माहितीनुसार 'येत्या मे महिन्यापासून शिक्षण संस्थेमध्ये टाटा इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून दहावी, बारावी व पदवीचे शिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांना रोजगार पूर्व प्रशिक्षण कोर्सेस सुरू होणार आहेत. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना चांगल्या कोर्सेस करता मडगाव किंवा पणजीला जाणे शक्य होत नाही. त्या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून नवीन अभ्यासक्रमा येथे सुरू करण्यात येतील. नुकत्याच झालेल्या नेक असेसमेंट मध्ये सदर महाविद्यालयाला ए प्लस मानांकन मिळाले असून ह्या एसेसमेंटच्या प्रक्रियेमध्ये समन्वयक म्हणून जबाबदारी सांभाळलेले प्रा.गुरुनाथ खानोलकर व प्रा. सुनीता बोरकर यांचा रवी नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
संस्थेचे पहिले प्राचार्य डॉ.अरुण हेबळेकर यावेळी म्हणाले की'हे महाविद्यालय म्हणजे संघर्ष व कठीण काळातून उभी राहिलेली व प्रगतीपथावर पोचलेली शिक्षण संस्था आहे. आम्ही त्याकाळी एक वेळ विद्यार्थ्यांना साधन सुविधा पुरविताना कमी पडलो असो, पण शैक्षणिक दर्जा ,उत्कृष्ट निकाल व अन्य गुणवत्तेच्या बाबतीत आम्ही कधीच तडजोड केली नाही.