नव्या इंग्रजी शाळांना अनुदान नाही
By admin | Published: July 27, 2015 02:03 AM2015-07-27T02:03:57+5:302015-07-27T02:04:08+5:30
पणजी : नव्या इंग्रजी शाळांना अनुदान नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घेतली आहे. डायोसेझन संस्थेच्या शाळांना जे
पणजी : नव्या इंग्रजी शाळांना अनुदान नाही, अशी स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी घेतली आहे. डायोसेझन संस्थेच्या शाळांना जे अनुदान काँग्रेस राजवटीपासून चालू आहे, त्यात कोणताही बदल केला जाणार नाही. ‘फोर्स’ची मागणी इंग्रजी माध्यमाच्या नव्या शाळांना अनुदान द्यावे, अशी असून ती पूर्ण करता येणार नाही; कारण सरकारचे धोरण मराठी, कोकणी या प्रादेशिक भाषांनाच प्रोत्साहन देण्याचे आहे, असे पार्सेकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. दुसरीकडे ‘फोर्स’चे सोमवार (दि.२७)पासून आझाद मैदानावर उपोषण सुरू होत आहे. संघटनेचे सचिव सावियो लोपिश येथील आझाद मैदानावर सोमवार पासून बेमुदत उपोषणास बसणार असून पालकही मागणी मान्य होईपर्यंत साखळी उपोषण करतील.
इंग्रजी माध्यमाच्या सर्वच प्राथमिक शाळांना सरकारने अनुदान द्यावे, अशी संघटनेची मागणी आहे. १ जुलै २0१४ रोजी राज्य मंत्रिमंडळाने जो निर्णय घेतला त्याचे कायद्यात रूपांतर व्हायला हवे, त्यासाठी विधानसभेत विधेयक आणणे आवश्यक आहे. ही मागणी धसास लागेपर्यंत आंदोलन चालूच ठेवू, असा इशारा संघटनेने दिला आहे. आर्च डायोसेझनच्या शाळांसह या मागणीला १८0 शाळांचा पाठिंबा असल्याचा दावा लोपिश यांनी केला आहे. या प्रतिनिधीशी बोलताना लोपिश म्हणाले की, पर्रीकर मुख्यमंत्री असताना सरकारने आम्हाला तोडगा दिला होता, तो आम्ही
स्वीकारला. (पान ७ वर)