पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह, घटक पक्षांमध्ये वाद

By ऑनलाइन लोकमत | Published: February 7, 2019 12:14 PM2019-02-07T12:14:27+5:302019-02-07T12:18:25+5:30

गोव्यातील पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाला असून सरकार पडू शकते, अशी विधाने घटक पक्षच करू लागल्याने विरोधी काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे.

New question about the stability of the Parrikar government, arguments in the constituent parties | पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह, घटक पक्षांमध्ये वाद

पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह, घटक पक्षांमध्ये वाद

Next

पणजी : गोव्यातील पर्रीकर सरकारच्या स्थिरतेविषयी नव्याने प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. यावेळी सत्ताधारी आघाडीतील घटक पक्षांनीच प्रश्नचिन्ह उभे केले आहे. मगोप आणि गोवा फॉरवर्ड या दोन घटक पक्षांमध्ये वाद सुरू झाला असून सरकार पडू शकते, अशी विधाने घटक पक्षच करू लागल्याने विरोधी काँग्रेस पक्ष सतर्क झाला आहे. अस्थिरतेचा लाभ उठवण्यासाठी काँग्रेस पक्ष स्वत:ची वेगळी रणनीती आखू लागला आहे.

गोवा फॉरवर्ड आणि महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, असे दोन पक्ष सत्ताधारी आघाडीचे घटक आहेत. या दोन्ही पक्षांकडे मिळून एकूण सहा आमदार आहेत. काँग्रेसच्या दोघा आमदारांनी राजीनामे दिल्याने दोन विधानसभा मतदारसंघांत पोटनिवडणुका होत आहेत. दोन्ही ठिकाणी मगोपाने भाजपाच्या उमेदवारांविरुद्ध आपले उमेदवार उभे करण्याचे ठरवले आहे. गोवा फॉरवर्डचे मंत्री सरदेसाई यांचा यास आक्षेप आहे. तसेच सरकारमधील अपक्ष आमदार आणि कला संस्कृती खात्याचे मंत्री गोविंद गावडे यांचाही मगोपाच्या भूमिकेला आक्षेप आहे. मगोपा जर पोटनिवडणुकीच्या रिंगणातून माघार घेणार  नसेल तर मगो पक्षाला सरकारमधून बाहेर घालवावा, अशी भूमिका पुढील आठवडाभरात मंत्री सरदेसाई आणि मंत्री गावडे घेऊ शकतात, अशी माहिती मिळाली.

सत्तेत राहुनही मगो पक्ष भाजपाविरुद्ध पोटनिवडणुका लढवतोय, याची मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी दखल घ्यावी आणि योग्य ती भूमिका घ्यावी अशी मागणी सरदेसाई यांनी केली आहे. मैत्रीपूर्ण लढती असा काहीच प्रकार असत नाही, सत्तेत असलेले दोन पक्ष एकमेकांविरुद्ध विधानसभेच्या पोटनिवडणुका लढवू शकत नाही, आपण हा मुद्दा मुख्यमंत्र्यांसमोर मांडला आहे. मुख्यमंत्री आजारातून बरे झाल्यानंतर या विषयावर काही तरी स्पष्ट भूमिका घेतील, असे सरदेसाई म्हणाले. 

मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी मात्र मगोप पोटनिवडणुकीतून माघार घेणार नाही, असे स्पष्ट केले आहे. मगो पक्ष सरकारसोबतच आहे. सरकार पडणार नाही पण सरदेसाई यांची विधाने जर ऐकली तर गोवा फॉरवर्डलाच सरकारमध्ये राहण्याची इच्छा राहिलेली नसावी असे वाटते.  

Web Title: New question about the stability of the Parrikar government, arguments in the constituent parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.