हंगाम संपला तरी पणजी बाजारात निलम आंबे; २५० रुपये किलोने विक्री
By पूजा प्रभूगावकर | Published: October 15, 2023 12:56 PM2023-10-15T12:56:38+5:302023-10-15T12:56:52+5:30
आंब्यांचा हंगाम संपाला तरी अजूनही पणजी बाजारात आंबे मिळत आहेत. बाजारात पुन्हा एकदा निलम आंबे दाखल झाले असून त्याची २५० रुपये किलो दराने विक्री होत आहेत.
पणजी: आंब्यांचा हंगाम संपाला तरी अजूनही पणजी बाजारात आंबे मिळत आहेत. बाजारात पुन्हा एकदा निलम आंबे दाखल झाले असून त्याची २५० रुपये किलो दराने विक्री होत आहेत.
साधारणता मार्च ते पावसाळा सुरु होई पर्यंत आंब्यांचा हंगाम असतो. या काळात हापूस, मानकुराद, आफोंसो, निलम , तोतापुरी असे विविध आंबे दाखल होतात. मात्र यंदा पावसाळा संपुष्टात येऊन हिवाळ्याची चाहूल लागली तरी आंबे मिळत आहेत. मध्यंतरी बाजारात आंबे उपलब्ध नव्हते. मात्र आता ते दाखल झाले आहेत. महत्वाचे म्हणजे निलब आंब्यांचा दर जास्त असला तरी लोक ते खरेदी करीत आहेत.
दरम्यान बाजारात भाज्यांचे दर स्थिर असून यात कुठलीही वाढ झाले नाही. टाेमॅटोचे दरही बऱ्यापैकी उतरल्याने सध्या ते २५ ते ३० रुपये किलो या दराने मिळत आहेत. तर कांदा मात्र किंचीत महाग असून तो ४० रुपये किलो झाला आहे. याशिवाय गावठी भाज्यांच्या दरातही कुठलीच वाढ झालेली नाही.