झुवारी पूल: दुसरी लेन २४ जानेवारीपूर्वी खुली: नीलेश काब्राल 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2023 08:58 AM2023-11-14T08:58:55+5:302023-11-14T08:59:10+5:30

येत्या ३० पूर्वी 'लोड टेस्टिंग', १० डिसेंबरपर्यंत काम पूर्ण होणार

nilesh cabral said zuari bridge second lane opened before january 24 | झुवारी पूल: दुसरी लेन २४ जानेवारीपूर्वी खुली: नीलेश काब्राल 

झुवारी पूल: दुसरी लेन २४ जानेवारीपूर्वी खुली: नीलेश काब्राल 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : कोणत्याही अडचणी न आल्यास झुवारी पुलाची दुसरी चौपदरी लेन दि. २४ जानेवारीपूर्वी खुली केली जाईल. दुसऱ्या लेनचे काम १० डिसेंबरपर्यंत पूर्ण केले जाईल. त्याआधी दि. ३० पर्यंत भार वाहण्याची क्षमता चाचणी (लोड टेस्टिंग) केली जाईल, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री नीलेश काब्राल यांनी दिली.
 
मंत्री काब्राल म्हणाले की, 'मध्यंतरी पाऊस पडल्याने हॉटमिक्सिंगचे काम आठवडाभर बंद ठेवण्यात आले होते. पुढील काळात अशा काही अडचणी आल्या नाहीत, तर ठरल्याप्रमाणे २४ जानेवारीपूर्वीच दुसरी लेनही खुली करू.' काब्राल म्हणाले की, उद्घाटनाची तारीख मुख्यमंत्री ठरवतील.

किनाऱ्यांवर शॅक्सच्या सांडपाण्यावर प्रक्रिया करण्यासाठी २ कि. मी. पासून १५ कि. मी. पर्यंत कमी क्षमतेचे तात्पुरते लहान मलनिःसारण प्रकल्प उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे पर्यावरणमंत्री या नात्याने बोलताना नीलेश काब्राल यांनी सांगितले. ६ वर्षांच्या कालावधीसाठी कंत्राटदार नेमले जातील. प्रत्येक शॅकचे दरदिवशी सुमारे ४ टन सांडपाणी तयार होते. टँकरने किंवा अन्य वाहनाने दररोज हे पाणी मलनि:सारण प्रकल्पांपर्यंत पोहोचवणे शक्य नाही. त्यामुळे रॉक्सना लहान मलनि:सारण प्रकल्प उपलब्ध करून देणे संयुक्तिक आहे. प्रक्रिया केलेले पाणी रॉक व्यावसायिक वापरू शकतात' असे काब्राल म्हणाले.

पर्वरी उड्डाणपूलप्रकरणी चर्चा सुरु

सुमारे ३५० कोटी रुपये खर्चून पर्वरी येथे बांधण्यात येणार असलेल्या उड्डाणपुलाबद्दल विचारले असता मंत्री काब्राल म्हणाले की, भू संपादनासाठी जमीन मालकांकडे बोलणी सुरु आहेत. ज्या ठिकाणी पूल वळवावा लागणार आहे, तेथे काय पर्यायी व्यवस्था करता येईल याचीही चाचपणी सुरु आहे. मी स्वतः दोन ते तीनवेळा पाहणी केली आहे. स्थानिक आमदार तथा मंत्री रोहन खंवटे यानीही पाहणी केली आहे.'

मलनिःसारण लवकरच काढणार निविदा

रॉक्सप्रकरणी दि. १५ मे रोजी हे तात्पुरते प्रकल्प हटवले जातील व नव्या हंगामात पुन्हा उभारले जातील. मलनि:सारण महामंडळ यासाठी लवकरच निविदा काढणार आहे. आधी सरकारी जागेतील रॉक्सना व कालांतराने खासगी जमिनीतील रॉक्सना ही व्यवस्था केली जाईल.

 

Web Title: nilesh cabral said zuari bridge second lane opened before january 24

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा