रिव्हर मॅरेथॉनमध्ये नीलेश कुळये, उर्मिला बानी यांची बाजी

By समीर नाईक | Published: December 10, 2023 07:11 PM2023-12-10T19:11:23+5:302023-12-10T19:11:35+5:30

रत्नागिरीच्या नीलेश कुळयेने पुरुषांची सुमारे ४२ कि.मी ची पूर्ण मॅरेथॉन शर्यत २:४९:३३ अशी वेळे घेत जिंकली, तर महिला गटात मुंबईच्या उर्मिला बानीने ४:१५:२५ अशा वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली.

Nilesh Kulaye, Urmila Bani win in River Marathon | रिव्हर मॅरेथॉनमध्ये नीलेश कुळये, उर्मिला बानी यांची बाजी

रिव्हर मॅरेथॉनमध्ये नीलेश कुळये, उर्मिला बानी यांची बाजी

वास्को : वास्को येथे रविवारी पार पडलेल्या प्रतिष्ठेच्या १३व्या एसकेएफ रिव्हर मॅरेथॉनमध्ये रत्नागिरीच्या नीलेश कुळये आणि मुंबईच्या उर्मिला बानी यांनी पुरुष व महिला अनुक्रमे गटात विजेतेपद प्राप्त केले. त्याचप्रमाणे यूएसएच्या मारिसा मर्फी आणि उडुपीच्या सचिन पुजारी यांनी २० मायलर शर्यत जिंकली, तर गोव्याच्या सपना पटेल आणि रत्नागिरीच्या सिद्धेश बर्जे यांनी हाफ मॅरेथॉन जिंकली.

रत्नागिरीच्या नीलेश कुळयेने पुरुषांची सुमारे ४२ कि.मी ची पूर्ण मॅरेथॉन शर्यत २:४९:३३ अशी वेळे घेत जिंकली, तर महिला गटात मुंबईच्या उर्मिला बानीने ४:१५:२५ अशा वेळेत मॅरेथॉन पूर्ण केली. नव्याने सादर करण्यात आलेल्या २० मायलर शर्यतीत (३२ कि.मी) यूएसएच्या मारिसा मर्फीने महिलांच्या गटात २:४४:१९ तासांच्या प्रभावी वेळेसह विजेतेपद पटकावले, तर उडुपीच्या सचिन पुजारीने १:५७:५१ तासांमध्ये पुरुष गटात विजेतेपद पटकावले. रत्नागिरीच्या सिद्धेश बर्जेने पुरुषांची हाफ मॅरेथॉन १:१३:२४ अशी वेळ घेत जिंकली आणि गोव्याच्या सपना पटेलने १:३५:२६ वेळ घेत महिलांची हाफ मॅरेथॉन जिंकली. तसेच मुलांच्या गटात मुरगाव हायस्कूल, वास्कोने ५ कि.मी सांघिक स्पर्धा जिंकली, तर मुलींच्या गटात विद्या विहार शाळेने ५ कि.मी सांघिक स्पर्धा जिंकली.

यूएसए, यूके, नेदरलँड्स, दिल्ली, बेंगळुरू, मुंबई, पुणे आणि ठाणे यासारख्या ठिकाणांहून आलेल्या मॅरेथॉनपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला होता.

 प्रतिक्रीया 
गेल्या तीन वर्षांपासून पोडियम फिनिशर असल्याने यावेळी देखील स्पर्धा जिंकणे हा दबाव होताच. चिखलीच्या टेकडीवर दोनदा धावणे
आव्हानात्मक होते, यात वेळही खुप लागतो, अन्यथा हा एक उत्कृष्ट मार्ग आहे.
 -नीलेश कुळये, मॅराथोनपटू 

हाफ मॅरेथॉन जिंकून खूप आनंदी आहे. मी दररोज खूप कठोर सराव करते. याचे सार्थक झाले. तसेच मी ५००० मीटर आणि १०,००० मीटर शर्यतीत गोव्याचे प्रतिनिधीत्व देखील केले आहे, या अनुभवाचा फायदा मला यावेळी झाला.
 -सपना पटेल, मॅराथोनपटू 

 सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे
४२ कि.मी, पुरुष

१) निलेश कुळये (रत्नागिरी) २:४९:३३
२) ओमप्रकाश सरन (बेंगळुरू) २:५०:४८
३) नॅथन फ्लेअर (यूके) २:५८:०४

४२ कि.मी, महिला
१) उर्मिला बानी (मुंबई) ४:१५:२५
२) रेणू राजगुरु (रायपूर) ५:१७:३५
३) वैजयंती (ठाणे) ५:१८:३०

२० मायलर (३२ कि.मी) पुरुष
१) सचिन पुजारी (उडुपी) १:५७:५१
२) हरिराम मौर्य (ठाणे) २:०७:०६
३) लोकेश बघेल (बेळगाव) २:०८:०७

२० मायलर (३२ कि.मी) महिला
१) मारिसा मर्फी (यूएसए) २:४४:१९
२) शर्मिला कदम (ठाणे) २:४७:३१
३) लतिका अरविंद (बेंगळुरू) २:४८:५०

२१ कि.मी पुरुष
१) सिद्धेश बर्जे (रत्नागिरी) १:१३:२४
२) अंकित यादव (वास्को) १:२६:१०
३) किरॉन ब्राउन (यूके) १:३४:४७

२१ कि. मी महिला
१) सपना पटेल (वास्को) १:३५:२६
२) इमके ग्रेन्स (नेदरलँड्स) १:४१:४५
३) राजलक्ष्मी स्वामीनाथन (बेंगळुरू) १:५१:०२

१० कि.मी पुरुष
१) करण शर्मा (मुंबई) ००:३३:३६
२) संजय झाकणे (परभणी) ००:३३:५१
३) ओंकार बायकर (रत्नागिरी) ००:३४:१५

१० कि.मी महिला
१) आश्लेषा मंगळे (कोल्हापूर) ००:४५:१६
२) नीरा कटवाल (बेंगळुरू) ००:४६:४५
३) खुशबू बघेल (ठाणे) ००:४८:३२

५ कि.मी शालेय संघ, मुले
१) मुरगाव हायस्कूल, वास्को, १:२२:३५
२) विद्या विहार हायस्कूल, कुठठाळी १:३१:५०
३) केंद्रीय विद्यालय, १:३२:२८

५ कि.मी शालेय संघ, मुली
१) विद्या विहार हायस्कूल, कुठठाळी, २:०३:११
२) केशव स्मृती शाळा, २:१४:०३
३) भारती विद्याभवन, २:१९:५०

 

Web Title: Nilesh Kulaye, Urmila Bani win in River Marathon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.