गोव्यात नऊ तलावांची जागा पाणथळ अधिसूचित, मसुदा जारी; जनतेकडून ६० दिवसात हरकती, सूचना मागवल्या

By किशोर कुबल | Published: September 28, 2023 08:45 PM2023-09-28T20:45:26+5:302023-09-28T20:46:09+5:30

जनतेकडून पुढील ६० दिवसांच्या आत हरकती व सूचना मागवल्या आहेत.

Nine lakes place in Goa notified as wetlands, draft issued; Objections and suggestions were sought from the public within 60 days | गोव्यात नऊ तलावांची जागा पाणथळ अधिसूचित, मसुदा जारी; जनतेकडून ६० दिवसात हरकती, सूचना मागवल्या

गोव्यात नऊ तलावांची जागा पाणथळ अधिसूचित, मसुदा जारी; जनतेकडून ६० दिवसात हरकती, सूचना मागवल्या

googlenewsNext

पणजी : राज्यातील नऊ तलावांची जागा पाणथळ जाहीर करण्यासाठी प्राधिकरणाने मसुदा अधिसूचना काढली आहे. जनतेकडून पुढील ६० दिवसांच्या आत हरकती व सूचना मागवल्या आहेत.

मसुदा अधिसूचनेत नमूद केल्यानुसार वास्कोतील मायमोळे तलावासाठी २,६६,६२७ चौ. मि जमीन पाणथळ म्हणून अधिसूचित केली जाणार आहे. भारतीय सीएसआयआर व एनआयओने येथे सर्वेक्षण करुन अहवाल दिला असून ही जमीन पाणथळ म्हणून अधिसूचित करावी, असे सूचवले आहे. ५० मिटर वेर्णा येथे तळ्यासाठी ५३९३ चौरस मिटर जमीन पाणथळ म्हणून अधिसुचित केली जाणार आहे. राय (सासष्टी) येथे बाकभाट तळ्यासाठी ७५,००९ चौ. मि. तर बेबकी तळ्यासाठी १०,५२५ चौ. मी. जमीन अधिसूचित केली जाईल. बाणावली येथे कमला तळ्यासाठी सर्व्हे क्रमांक ३९७/१ मधील ८०५० चौरस मिटर जमीन पाणथळ म्हणून अधिसूचित केली जाणार आहे. सासष्टीतील कावोरी येथील वयलें तळें या तलावासाठी १, ५६,८८६ चौ. मि जमीन पाणथळ अधिसूचित केली जाईल.

लामगांव, डिचोली येथील तळ्यासाठी सर्वे क्रमांक २५/१ मध्ये ३३७५ चौरस मिटर जमिन पाणथळ अधिसूचित केली जाईल. शिरोडा येथील मोइनगळ तळ्यासाठी २,७१७ चौरस मिटर जमीन पाणथळ अधिसूचित केली जाईल तर कुठ्ठाळी येथील व्हडले-धाकटे तळ्यासाठी ८७,१२६ चौ. मि. जमीन अधिसूचित केली जाईल.

पाणथळ जागांच्या ठिकाणी ५० मिटरचा बफर झोन असेल. राज्य पाणथळ जागा प्राधिकरणाच्या तेराव्या बैठकीत ठरल्यानुसार या तलावांच्या परिसरात पूर्वी जी बांधकामे आहेत त्या बांधकामांची मालकी बदलणार नाही. मासेमारी, धार्मिक विधी यासाठी तलावांमध्ये प्रतिबंध असणार नाहीत.
 

Web Title: Nine lakes place in Goa notified as wetlands, draft issued; Objections and suggestions were sought from the public within 60 days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.