मडगावात 90 लाखांचा गंडा, संशयितांवर गुन्हा नोंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 21, 2019 08:03 PM2019-05-21T20:03:21+5:302019-05-21T20:03:24+5:30
जमीन विक्री प्रकरणात 90 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणाची एक तक्रार गोव्यातील मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, अब्दुल्ला बुडेसाब मकंदर (48) व ताज कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रायटरवर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मडगाव: जमीन विक्री प्रकरणात 90 लाखांचा गंडा घातल्याप्रकरणाची एक तक्रार गोव्यातील मडगाव पोलीस ठाण्यात नोंद झाली असून, अब्दुल्ला बुडेसाब मकंदर (48) व ताज कन्स्ट्रक्शनच्या प्रोप्रायटर पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. भारतीय दंड संहितेच्या 447 व 420 कलमाखाली पोलिसांनी संशयितांवर गुन्हा नोंद केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सागर धाटकर पुढील तपास करीत आहेत.
संस्किृती कन्स्ट्रक्शन प्रा.लि.चे संचालक राजेश कुरार हे तक्रारदार आहेत. संशयितांनी समन्वयक करार करून आके - बायश येथे सर्व्हे क्रमांक 26/ 0 ही जमीन 1 कोटी 40 लाख रुपयांना खरेदी करण्याचे करार केला होता. मात्र प्रत्यक्षात 50 लाख रुपये अदा केले होते. मात्र नंतर संशयिताने बेकायदेशीररीत्या त्या जमिनीवर जमीन मालकाला न विचारता बांधकामही सुरू केले होते. कारारानुसार रक्कमही फेडली गेले नाही. 29 एप्रिल 2019 पूर्वी हा वायदा ठरला होता. रक्कमही मिळाली नाही व वरून अतिक्रमण करून बांधकामालाही सुरुवात केल्यानंतर या प्रकरणी आता पोलिसांत तक्रार नोंदविण्यात आली आहे. पुढील पोलीस तपास चालू आहे.