म्हादईसाठी लढा देण्याची तयारी ठेवा, दिगंबर कामत यांचे आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: March 5, 2020 12:46 PM2020-03-05T12:46:07+5:302020-03-05T13:07:30+5:30
म्हादई जल तंटा लवादाचा पाणी वाटपाबाबतचा निवाडा अधिसूचित झाल्याने कर्नाटकसाठी पाणी वळविण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची गोमंतकीयांची संतप्त भावना बनली आहे
पणजी - गोव्याची जीवनदायीनी म्हादईचे पाणी वळविण्यासाठी कर्नाटकने पूर्ण तयारी केली असून गोव्याचे वाळवंट होण्याचे भयंकर संकट आज गोवेकरांसमोर उभे आहे. तेव्हा म्हादईसाठी लढा देण्याची तयारी ठेवा, अशी हाक विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी दिली आहे. गोव्यावरील या संकटांच्या पार्श्वभूमीवर यंदा आपला वाढदिवस साजरा न करण्याचे कामत यांनी ठरविले आहे. कामत यांचा येत्या रविवारी 8 रोजी वाढदिवस आहे.
कामत म्हणतात की, या संकटाचा सामना करणे हे प्रत्येक गोमंतकीयाचे कर्तव्य आहे. गोव्यावर संकटाचे काळे ढग आलेले असताना, माझा वाढदिवस साजरा करणे माझ्या मनाला पटत नाही. त्यामुळे यंदा वाढदिवस साजरा न करण्याचे ठरविले आहे. माझ्या हितचिंतकांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासही मी उपलब्ध असणार नाही. माझ्या वाढदिवशी कुणीही जाहिराती देऊ नयेत व पोस्टर, बॅनर लावू नयेत, अशी माझी नम्र विनंती आहे.'
म्हादई जल तंटा लवादाचा पाणी वाटपाबाबतचा निवाडा अधिसूचित झाल्याने कर्नाटकसाठी पाणी वळविण्याचा मार्ग आता मोकळा झाला असल्याची गोमंतकीयांची संतप्त भावना बनली आहे. कामत पुढे म्हणतात की, आज कोरोना व्हायरसचा वेगाने फैलाव होत असून , त्यापासून बचाव करण्याची व योग्य खबरदारी घेण्याची सर्वांची जबाबदारी आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Big Breaking : भारतीय महिला संघाची ICC Women's T20 World Cupच्या अंतिम फेरीत धडक
China Coronavirus : आता 'कोरोना'लाही विम्याचं कवच? कंपन्यांकडून तयारी सुरू
Narendra Modi : पंतप्रधान मोदींच्या परदेश दौऱ्यांवर पाच वर्षांत 446 कोटींचा खर्च
China Coronavirus : 'राहुल गांधींनी कोरोना चाचणी केली का?', भाजपा खासदाराचा सवाल
भाजप सरकारच्या काळात २000 कोटींची अनियमितता, कॅगचा ठपका