कितीही मतभेद झाले, तरीही पक्ष सोडू नये, हा धडा मी शिकलो: मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2023 02:53 PM2023-12-15T14:53:12+5:302023-12-15T14:53:35+5:30
कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलून दाखवले.
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : पक्षात कोणाशीही कितीही मतभेद झाले, तरी आपला मूळ पक्ष कधी सोडता कामा नये, हा धडा मी शिकलो, अशी उपरती झालेले कळंगुटचे आमदार मायकल लोबो यांनी प्रसारमाध्यमांकडे बोलून दाखवले.
भाजप सोडला, ही आपली मोठी चूक होती, हे त्यांनी अनेकदा मान्य केले आहे. बुधवारीही प्रसारमाध्यमांकडे बोलताना त्यांनी आपली चूक पुन्हा एकदा मान्य केली. आज जरी ते भाजपात असले, तरी फेब्रुवारी २०२२च्या विधानसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी त्यांनी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता.
काँग्रेसच्या तिकिटावर स्वतः निवडून आले व पत्नी डिलायला यांनाही निवडून आणले; परंतु नंतर सप्टेंबर २०२२ मध्ये काँग्रेसमधून फुटून भाजपात आले. अलीकडे लोबो पूर्वीप्रमाणे विधाने करत नाहीत. ते शांत का? असा प्रश्न केला असता 'शांत राहणे हेच सोन्यासारखे' असे ते म्हणाले.
मनोहर पर्रीकर हे लोबोंसाठी आदर्श होते. आजही ते सांगतात की, 'गोव्याचे पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर, जॅक सिक्वेरा व मनोहर पर्रीकर या तीन नेत्यांना गोवा कधीच विसरू शकणार नाही.'