कोणीही आमदार नाराज नाहीत : रमेश तवडकर
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2023 10:49 AM2023-11-25T10:49:20+5:302023-11-25T10:50:10+5:30
सभापती रमेश तवडकर यांनी मडगावात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
लोकमत न्यूज नेटवर्क मडगाव : माजी आमदार नीलेश काब्राल यांच्याबाबत केंद्रीय वरिष्ठ नेत्यांनी काब्राल यांना विश्वासात घेऊनच घेतलेला आहे. राज्य सरकारचे कामकाज व्यवस्थित सुरू आहे. सत्ताधारी पक्षातील कोणत्याही आमदारामध्ये नाराजी नाही. तसेच सध्या तरी कुठल्याही मंत्र्यांना वगळण्याचा विचार नसल्याचे सभापती रमेश तवडकर यांनी मडगावात एका कार्यक्रमानंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी आमदार अपात्रता याचिकेची सुनावणी सुरू असताना मंत्री आलेक्स सिक्वेरा यांना मंत्रीपद देण्यास विरोध दर्शविला. यासंबंधी त्यांना विचारले असता त्यांनी विरोधकांना लोकशाहीत आपली बाजू मांडण्याचा अधिकार आहे. त्यावर काय निर्णय घ्यायचा तो आपण घेणार असल्याचे ते म्हणाले.
काब्राल यांना विश्वासात घेऊनच निर्णय घेण्यात आला आहे. काँग्रेस पक्षामधून भाजपात आलेल्या आमदारांना पद देणे आवश्यक होते मात्र, केंद्रीय पक्षश्रेष्ठींकडून आदेश आल्यानंतर त्याचे पालन करणे आवश्यक असल्याने त्यानुसार सर्व निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. आणखीन दोन मंत्र्यांना वगळण्यात येणार अशी चर्चा सुरू आहे त्या चर्चेबद्दल ते म्हणाले, कुणाला मंत्रिमंडळातून काढण्याचा विषय तूर्त नाही.
विधानसभा अधिवेशन जानेवारी महिन्यात होणार आहे ते एक आठवड्याचे असेल. अद्याप बैठक झालेली नाही. विधानसभा अधिवेशनाचे सत्र एक महिना अगोदर ठरविण्यात येते, अशी माहितीही सभापती तवडकर यांनी दिली.