पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांची गय नाही : खंवटे, किनाऱ्यांवर लवकरच सीसीटीव्ही 

By ऑनलाइन लोकमत | Published: July 26, 2023 02:15 PM2023-07-26T14:15:22+5:302023-07-26T14:17:07+5:30

आतापर्यंत ४२५ दलालांना अटक

no more pimps robbing tourists said minister rohan khaunte in goa assembly monsoon session 2023 | पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांची गय नाही : खंवटे, किनाऱ्यांवर लवकरच सीसीटीव्ही 

पर्यटकांना लुबाडणाऱ्या दलालांची गय नाही : खंवटे, किनाऱ्यांवर लवकरच सीसीटीव्ही 

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजीः पर्यटकांना लुबाडणाऱ्या : दलालांची गय केली जाणार नाही. किनाऱ्यांवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी केंद्राकडे निर्भया निधीतून पैसे मागितले आहेत. गेल्या वर्षभरात ४२५ दलालांना अटक झाली व १३ लाख रुपये दंड वसूल करण्यात आला, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काल विधानसभेत दिली.

पर्यटन खात्याच्या अनुदान मागण्यांवरील चर्चेला उत्तर देताना खंवटे बोलत होते. या खात्याच्या अनुदान मागण्या विधानसभेत मंजूर केल्या. 'गोवा हाट'साठी वर्क ऑर्डर दिली असून लवकरच पायाभरणी होईल, असे खंवटे यांनी स्पष्ट केले. 'युनिटी मॉल'साठी केंद्राकडून निधी मिळेल. राजधानी पणजीनजीक जागा शोधली आहे, असे ते म्हणाले. सागरमाला अंतर्गत बांधण्यात येणाऱ्या जेटी पूर्वीही होत्या तेथे नूतनीकरण होत असून हाऊस बोट, पर्यटकांच्या सोयीसाठी बोटी लागतील यासाठी अभ्यास केला जात आहे.

१५ आयटी युनिटनी ८० लाख रुपये

आयटी खात्याच्या अनुदान मागण्यावरील चर्चेत उत्तर देताना ते बोलत होते. आयटी मंत्री खंवटे म्हणाले की, ड्रोन धोरण तयार करण्याचे काम चालू आहे. लोकांना गतीने सेवा मिळाव्यात यासाठी एआय आधारित चॅटबॉट आणले जाईल. पर्यटन, सार्वजनिक गाहाणी विभागासाठी चॅट बॉट आणू असे खंवटे म्हणाले. गोवा स्टार्ट अप धोरणाअंतर्गत ११५ लाभार्थीना ३.२७ कोटी वितरीत केले. १५ आयटी युनिटनी ८० लाख रुपये दिल्याचे खंवटे म्हणाले.

अमेरीका, जापान, द. कोरीया, युएईवर लक्ष

पर्यटकांसाठी इंग्लंड व रशियावरच गोवा अवलंबून होता. कोविडवेळी काही मर्यादा लक्षात आल्या आणि नवीन राष्ट्रांची पर्यटनासाठी बाजारपेठ शोधावी लागली. पर्यटक मोठ्या संख्येने येण्यापेक्षा कमी पर्यटक आले तरी ते दर्जेदार असावेत. खंवटे म्हणाले की, आम्ही अमेरिका, जपान, दक्षिण कोरिया, युएईतील पर्यटकांना लक्ष केंद्रीत करत आहोत.

३५ खात्यांच्या २२७ सेवा ऑनलाईन

सर्वसामान्य नागरिकांनी सरकार दरबारी असलेल्या कामासाठी कार्यालयांमध्ये हेलपाटे मारण्याची गरज नाही, ३५ वेगवेगळ्या सरकारी खात्यांच्या तब्बल २२७ सेवा ऑनलाईन केल्या असून ६ लाख ८० हजार गोमंतकीय त्याचा वापर करत आहेत. आतापर्यंत २२ लाख ५७ हजार रुपयाचे व्यवहार ऑनलाईन झालेले आहेत अशी महत्त्वपूर्ण माहिती मंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत दिली.

'गोवा टॅक्सी' अॅप लवकरच

गोवा टॅक्सी अॅप लवकरच सुरू केले जाईल, जेणेकरून पर्यटक तसेच गोमंतकीयांना ऑनलाईन टॅक्सी आरक्षित करता येतील. जलक्रीडांच्या बाबतीत दलालांना थारा दिला जाणार नाही. ज्या काही बेकायदा गोष्टी किनारपट्टीत चालतात त्यावर कठोर कारवाई करून बंद केल्या जातील.

 

Web Title: no more pimps robbing tourists said minister rohan khaunte in goa assembly monsoon session 2023

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.