बरखास्तीची गरज नाही!

By admin | Published: February 14, 2017 03:00 AM2017-02-14T03:00:30+5:302017-02-14T03:00:30+5:30

पणजी : गोवा विधानसभा बरखास्त करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले.

No need for dismissal! | बरखास्तीची गरज नाही!

बरखास्तीची गरज नाही!

Next

पणजी : गोवा विधानसभा बरखास्त करण्याची गरज नाही, असे मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी सोमवारी येथे पत्रकारांना सांगितले. विधानसभेचे अधिवेशन सहा महिन्यांत झाले नाही तरी, नवी विधानसभा अस्तित्वात येण्याची प्रक्रिया ही निवडणूक आयोगामुळे लांबली आहे. त्यामुळे गोवा सरकारने चिंता करण्याचे कारण नाही, असा सल्ला राज्याच्या अ‍ॅडव्होकेट जनरलांनी आपल्याला तोंडी दिल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
मुख्यमंत्री म्हणाले, की वास्तविक विधानसभेचे अधिवेशन बोलविण्यास आनंदच वाटला असता; पण नैतिकदृष्ट्या आता अधिवेशन बोलविणे योग्य नव्हे. कारण, नव्या विधानसभेसाठी मतदान झालेले आहे. शिवाय काही आमदारांनी राजीनामे दिल्याने विधानसभेची सदस्य संख्याही कमी झालेली आहे. विरोधी आमदारांचीच संख्या घटलेली आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, की नव्या वर्षाच्या पहिल्या अधिवेशनात राज्यपालांनी भाषण करणे अपेक्षित असते. नवे सरकार येत्या ११ मार्चनंतर अधिकारावर येईल. त्यामुळे राज्यपाल आताच काय म्हणून बोलतील, असाही प्रश्न येतो. मतदान झाल्यानंतर निकाल जाहीर करण्यास निवडणूक आयोगाने एक महिन्याचा कालावधी घेतला आहे. त्यामुळे दोष सरकारवर येत नाही. एजींच्या लेखी सल्ल्याचीही वाट पाहात आहे. (खास प्रतिनिधी)

Web Title: No need for dismissal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.