तुमच्या नावावर दुसरे कुणी बँकेचे कर्ज तर घेत नाही ना?
By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 09:49 AM2023-09-17T09:49:04+5:302023-09-17T09:50:11+5:30
तंत्रज्ञानामुळे सायबर गुन्हेगारीही वाढली : खातेधारकांनी सतर्क राहावे
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी : आजच्या काळात तंत्रज्ञान एवढे आधुनिक झाले आहे की सर्व काही एका क्लिकवर आले आहे. सर्व सामान्यांसाठी महत्वाचे असे FR असणाऱ्या बँक देखील आधुनिक होत आहेत. परंतु असे असताना अनेकजण या तंत्रज्ञानाचा गैरवापर करत लोकांना लुटण्याचेही काम करत आहेत.
बँकेमध्ये लोकांची संपूर्ण जीवनाची कमाई असते, अशावेळी एका क्षणातच पैसे खात्यातून गायब झाले तर त्यांचे काय होईल, याचा विचारही कुणाला सहन होणार नाही. पण गेल्या काही वर्षात असे अनेक प्रकार समोर आले आहेत. अनेक ठिकाणी तर ज्याचे पैसे गायब होतात, किंवा ज्याच्या खात्यावर कर्ज घेतले जाते, याची माहिती देखील नसते, असे दिसून आले आहे. सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढत आहे. त्यामुळे लोकांनी बँक खात्याशी संबंधित सर्व व्यवहार, कागदपत्रे योग्य पध्दतीने पडताळून पाहणे गरजेचे आहे. काही शंका आल्यास तातडीने बँकेशी संपर्क करावा.
ऑनलाईन फ्रॉडपासून वाचवा
ऑनलाईन फ्रॉडचे प्रमाण हल्ली प्रचंड वाढले आहे. मोबाईलवर किंवा संगणकवर एखाद्या संदेश येतो आणि तेथे लिकवर करण्याचे सांगण्यात येते. बँक अशाप्रकारची लिंक कधिच पाठवित नाही, आणि जर बँकने लिक पाठविली तर ते तुमचा पासर्वड, ओटीपी कधीच मागत नाही, आणि लोकांनी आपला पासवर्ड किंवा ओटीपी कधीच कुणाला देऊ नये.
क्रेडीट स्कोर नियमीत तपासा
क्रेडीट स्कोर लोकांनी नियमित तपासला पाहीजे, यातून तुमच्या खाते अपडेट आहे की नाही, किंवा किती कर्ज आहे, कोणी तुमच्या नावावर कर्ज घेतले आहे की नाही, हेही यावरुन कळते.
सायबर सेलकडे तक्रार करा
कुठल्याही प्रकारचे ऑनलाईन फ्रॉड जर झाले असेल तर क्षणाचाही विलंब न करता सायबर सेलकडे तक्रार करणे आवश्यक आहे. जर वेळेत तक्रार करण्यात आली तर बँकच्या माध्यमातून तुमचे खाते ब्लॉक करण्यात येऊ शकते, याने पैसे वाचण्याची शक्यता असते.
कागदपत्रे देताना घ्या काळजी
बँकेमध्ये हेरफेर हे फक्त लोकांच्या निष्काळजीपणा- मुळेच होत आहे. अनेकजण आपली महत्वाची कागदपत्रे कुणाकडेही सुपुर्द करतात, मग या कागद- पत्रांचा हॅकर्स गैरवापर करतात, व खात्यातील पैसे गायब करतात. त्यामुळे कागदपत्रे देताना काळजी घ्या, कुणावरही विश्वास ठेवून आपली महत्वाची कागदपत्रे देऊ नका.
लोकांची सुरक्षा लोकांच्याच हाती आहे, त्यामुळे ऑनलाईन पध्दतीने काहीही करण्यापूर्वी हजारवेळा विचार करावा. तसेच काही संशयास्पद वाटल्यास थेट आपल्या बँकशी संपर्क साधावा. तसेच कुठल्याही आमिषेला बळी पडू नये. - रमाकांत तारी, बँक अधिकारी.