२०२४ नंतर उत्तर गोव्यात पाणी टंचाई भासणार नाही: सुभाष शिरोडकर 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 11:38 AM2023-12-29T11:38:37+5:302023-12-29T11:39:07+5:30

तिळारीचे पाणी पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात.

no water shortage in north goa after 2024 said subhash shirodkar | २०२४ नंतर उत्तर गोव्यात पाणी टंचाई भासणार नाही: सुभाष शिरोडकर 

२०२४ नंतर उत्तर गोव्यात पाणी टंचाई भासणार नाही: सुभाष शिरोडकर 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : उत्तर गोव्याला २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत व्हावा या हेतूने सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले असल्याचे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी स्पष्ट केले आहे.

तिळारी धरणाच्या कालव्याचे दरवाजे खुले झाल्याने तेथून सोडलेले पाणी अखेर गुरुवारी सकाळी पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पात पोहोचले आहे. त्यामुळे पर्वरी व साळगाव परिसराला आता पाणीपुरवठा सुरळीत होईल. कालव्यांचे दरवाजे लॉक झाल्याने पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पाला पाणीपुरवठा बुधवारी होऊ शकला नव्हता. त्यानंतर पुण्याहून आलेल्या तज्ज्ञांच्या पथकाने हे दरवाजे खुले झाले, असे त्यांनी सांगितले.

शिरोडकर म्हणाले, की तिळारी कालव्यांच्या दुरुस्तीचे काम १३ नोव्हेंबरपासून हाती घेतले होते. महाराष्ट्राप्रमाणेच गोव्याने आपल्या बाजूने ९ किलोमीटर कालव्यांचे दुरुस्ती काम हाती घेतले. त्यासाठी गोव्याकडे होणारा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. काम हे एक महिन्यात पूर्ण करून पाणीपुरवठा २२ डिसेंबरपासून सुरळीत केला जाणार होता. मात्र, कालव्यांचे दरवाजे लॉक झाले. त्यामुळे ते उघडता न आल्याने पर्वरी जलशुद्धीकरण प्रकल्पात पाणीपुरवठा होऊ शकला नव्हता. त्यानंतर तिळारीचे पाणी सोडण्यात आले. 

गोव्यात विशेष करून उत्तर गोव्यात २०२४ अखेरपर्यंत पाण्याची कमतरता भासणार नाही. पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी सरकारने ३५० एमएलडी जलशुद्धीकरण प्रकल्पावर सुमारे २५० कोटी रुपये खर्च केले आहेत. याशिवाय पिळर्ण, पर्वरी येथील जलशुद्धीकरण प्रकल्पांचे कामही लवकरच पूर्ण होईल असेही शिरोडकर यांनी सांगितले.
 

Web Title: no water shortage in north goa after 2024 said subhash shirodkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.