नोबेल विजेत्यांचे गोव्यात ३ दिवस वास्तव्य; विद्यार्थी, शास्त्रज्ञांशी संवाद कार्यक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2018 10:21 PM2018-01-27T22:21:27+5:302018-01-27T22:21:37+5:30

नोबेल पारितोषिक विजेत्या ५ शास्त्रज्ञांचे गोव्यात १ ते  फेब्रुवारी या दरम्यानचे तीन दिवस वास्तव्य असणार असून या निमित्त या काळात शास्त्रज्ञ, विद्यार्थी व तज्ज्ञ लोकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.  

Nobel winners live in Goa for 3 days; Interaction program with students, scientists | नोबेल विजेत्यांचे गोव्यात ३ दिवस वास्तव्य; विद्यार्थी, शास्त्रज्ञांशी संवाद कार्यक्रम

नोबेल विजेत्यांचे गोव्यात ३ दिवस वास्तव्य; विद्यार्थी, शास्त्रज्ञांशी संवाद कार्यक्रम

Next

पणजी- नोबेल पारितोषिक विजेत्या ५ शास्त्रज्ञांचे गोव्यात १ ते  फेब्रुवारी या दरम्यानचे तीन दिवस वास्तव्य असणार असून या निमित्त या काळात शास्त्रज्ञ विद्यार्थी व तज्ज्ञ लोकांना त्यांच्याशी संवाद साधण्याची संधी उपलब्ध केली जाणार आहे.  

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी विशेष पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. उच्च शिक्षण खात्याचे संचालक प्रसाद लोलयेकर, विज्ञान आणि तंत्रज्ञान खात्याचे संचालक लेविन्सन मार्टीन्स आणि विज्ञान भारतीचे सुहास गोडसे हे यावेळी उपस्थित होते. याचाच एक भाग म्हणून  विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयातर्फे विज्ञान प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. देशभरातील २०० विद्यार्थी अणि ३०० शिक्षकांचा सहभाग त्यात असणार आहे. 

१ रोजी कला अकादमीत  संध्याकाळी ३.३० वाजता मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या ह्स्ते नोबेल प्रदर्शनाचं उद्घाटन केले जाणार आहे. त्याच दिवशी काही उद्योगपतींना त्यांच्याशी संवाद करण्याची संधी मिळणार आहे. त्यात पाच नोबेल पुरस्कार विजेत्यांचा सहभाग असेल. २ रोजी  संध्याकाळी  कला अकादमीत सकाळच्या सत्रात तज्ञांबरोबर विद्यार्थ्यांच्या संवाद कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.  ३ रोजी  हाच कार्यक्रम मडगाव येथील  रवींद्र भवनात दक्षिण गोव्यातील विद्यार्थ्यांसाठी होणार आहे. ३ रोजी राष्ट्रीय समुद्र विज्ञान संस्थेच्या शास्रज्ञांबरोबर त्यांचा संवाद ठेवण्यात आला आहे. 

१९९५ साली नोबेल पुरस्कार विजेत्या जर्मनीच्या शास्त्रज्ञ  ख्रिस्ती नुस्ली वॉल हार्ड यांची उपस्थिती गोमंतकियांना लाभणार आहे. जीन्स, पेशी या विषयांवरील त्यांच्या संशोधनासाठी त्यांना हा पुरस्कार मिळाला होता. याच विषयांवरील संशोधनासाठी नोबेल पुरस्कार प्राप्त झालेले अमेरिकन शस्त्रज्ञ जे मायकल  यांची उपस्थितीही लाभणार आहे. त्यांना १९८९ साली या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  मोरक्कोतील शास्त्रज्ञ सर्ज हार्च यांना २०१२ साली नोबेल पुरस्कार मिळाला होता. त्यांनी  धातू आणि प्रकाशाच्या संसर्गाच्या परिणामावर संशोधन केले आहे. तसेच रिचर्ड जे रोबर्ट या अमेरिकन शास्त्रज्ञाचे मार्गदर्शनही लाभणार आहे. त्यांना डीएनए व अरएनए विषयांवर संशोधन केले आहे. याच विषयावर महत्त्वपूर्ण संशोधन केलेले तोमस लिंडाल या स्वीडनमधील शास्रज्ञाचेही मार्गदर्शन लाभणार आहे. त्यांना १९३८ साली पुरस्कार मिळाला होता.

Web Title: Nobel winners live in Goa for 3 days; Interaction program with students, scientists

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.