ज्येष्ठता नव्हे, परफॉर्मन्स दाखवा, केजरीवालांचा गोव्यातील कार्यकर्त्यांना सल्ला

By admin | Published: August 23, 2016 09:11 PM2016-08-23T21:11:14+5:302016-08-25T00:40:23+5:30

केवळ ज्येष्ठतेच्या आधारे आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोठे पद मिळेल असे नाही. केवळ ज्येष्ठता नव्हे तर परफॉर्मन्स दाखवाअसा सल्ला आपच्या गोव्यातील सर्व प्रमुख कार्यकत्र्याना

Not senior, show performance, Kejriwal's advice to Goa workers | ज्येष्ठता नव्हे, परफॉर्मन्स दाखवा, केजरीवालांचा गोव्यातील कार्यकर्त्यांना सल्ला

ज्येष्ठता नव्हे, परफॉर्मन्स दाखवा, केजरीवालांचा गोव्यातील कार्यकर्त्यांना सल्ला

Next

ऑनलाइन लोकमत
पणजी, दि. २३ : केवळ ज्येष्ठतेच्या आधारे आम आदमी पक्षाच्या संघटनेत मोठे पद मिळेल असे नाही. केवळ ज्येष्ठता नव्हे तर परफॉर्मन्स दाखवा असा सल्ला आपच्या गोव्यातील सर्व प्रमुख कार्यकर्त्यांना दिल्लीचे मुख्यमंत्री व आपचे राष्ट्रीय निमंत्रक अरविंद केजरीवाल यांनी दिला.

विविध मतदारसंघांसाठी आपने जे समन्वयक नेमले आहेत, त्यांनाच येत्या विधानसभा निवडणुकीवेळी तिकीट मिळेल असे कुणीच गृहित धरू नये, असेही केजरीवाल यांनी सांगितले. कुणीच कुणाला तिकीटाची हमी देऊ नये. मी स्वत: देखील देऊ शकत नाही. कारण प्रत्येकाला आपच्या उमेदवार निवडीच्या व्यवस्थेमधूनच जावे लागेल. आमची व्यवस्था ठरलेली असून त्या व्यवस्थेद्वारेच उमेदवार निवडले जातील. काही कार्यकर्ते इंडिया अगेन्स्ट करप्शनच्या चळवळीच्या माध्यमातून आपमध्ये आले. काही कार्यकर्ते नंतर आले.

कुणीच आपण या बॅचचा कार्यकर्ता किंवा त्या बॅचचा कार्यकर्ता असे समजू नये. अगदी कालपरवा देखील आपमध्ये जो कार्यकर्ता आलेला असेल त्या कार्यकत्र्याने जर चांगला परफॉर्मन्स दाखवला व गुणांनी तो चांगला असेल तर त्यास आपमध्ये मोठे पद मिळेल. अशावेळी आपल्यावर अन्याय झाला अशी भावना ज्येष्ठ कार्यकत्र्यानी मनात आणू नये, असे केजरीवाल यांनी बजावले.
आपली चार दिवसांची गोवा भेट आटोपून केजरीवाल मंगळवारी सायंकाळी दिल्लीस परतले. जाण्यापूर्वी पणजीत त्यांनी आपच्या राज्यभरातील प्रमुख कार्यकत्र्याची एकत्रित बैठक घेतली व त्यांना काही महत्त्वाच्या सूचना दिल्या. आपण गोवाभर फिरलो तेव्हा आपसाठी अनुकूल वातावरण आपल्याला अनुभवायला मिळाले. या अनुकूलतेचा लाभ उठवायचा असेल तर तुम्हाला सर्वानाच जास्त काम करावे लागेल.

जास्त वेळ द्यावा लागेल, असेही केजरीवाल यांनी सांगितल्याचे पक्ष सुत्रंनी स्पष्ट केले. आपल्या काही बैठकांसाठी गोव्यात जागा देखील अपुरी पडली, लोकांचा एवढा प्रतिसाद लाभला. आपमध्ये कुठल्याही पक्षामधून कार्यकर्ते येऊ द्या. भाजप किंवा काँग्रेसमधूनही ते येऊ द्यात, त्यांचे स्वागत करा, त्यांना आपल्यातलेच समजा. आपणच तेवढे संत व चांगले व दुसरे वाईट अशी भावना कुणीच आणू नये,असाही सल्ला केजरीवाल यांनी कार्यकत्र्याना दिला. आम्ही जाहीर केलेला एखादा उमेदवार गुणांनी योग्य नाही, असे ऐनवेळी निवडणुकीप्रसंगी जर कुणी सिद्ध केले तर आम्ही त्या उमेदवारास मागे घेऊ व त्या जागेवर पाणी सोडू, असेही केजरीवाल यांनी सांगितले.

Web Title: Not senior, show performance, Kejriwal's advice to Goa workers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.