आज रात्री ११.३० पर्यंत समुद्रात जाऊ नका; आयएनसीओआयएसचा मच्छिमारांना इशारा
By वासुदेव.पागी | Updated: May 29, 2024 16:39 IST2024-05-29T16:38:23+5:302024-05-29T16:39:04+5:30
बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात पोह्याला किंवा मच्छीमारी करायला जाणे धोक्याचे ठरणार आहे.

आज रात्री ११.३० पर्यंत समुद्रात जाऊ नका; आयएनसीओआयएसचा मच्छिमारांना इशारा
वासुदेव पागी,पणजीः बुधवारी रात्री ११.३० वाजेपर्यंत समुद्रात पोह्याला किंवा मच्छीमारी करायला जाणे धोक्याचे ठरणार आहे. भारतीय राष्ट्रीय सागरी माहिती सेवा केंद्राने (आयएनसीओआयएस) खात्याने मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचा इशारा दिला आहे. कारण समुद्र खवळलेला असून ऊंच लाटा उसळत आहेत.
अचानक बदललेल्या हवामानामुळे समुद्र खवळलेला आहे. उंच लाटा किनाऱ्याला आधळत आहेत. आज दिवसभर समुद्र खवळलेला राहणार आहे. दिवस मावळल्यानंतरही तो शांत होण्याचे संकेतही नाही आहेत. त्यामुळे रात्री उशिरा ११.३० वाजेपर्यंत समुद्रात जाण्याची जोखीम मच्छिमारांनी घेऊ नये असा इशारा देण्यात आला आहे.
आयएनसीओआयएसने दिलेला हा इशारा भारतीय हवामान खात्याने प्रसारित केला आहे. समुद्रात दीड मीटरपेक्षा उंच लाटा उसळण्याची शक्यता आहे. तसेच समुद्रातील प्रवाहही (करंट ) गतीमान झाले आहेत. सध्या ३५ ते ५१ सेंटीमीटर प्रती सेकंद इतक्या गतीने ते प्रवाहीत असून ही गती आणखी वाढण्यात शक्यता असल्याचेही या इशाऱ्यांत म्हटले आहे.